*महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन**सलाम त्यांच्या कार्याला....*

*विशेष लेख*
*काही क्षण असे असतात, की जे लोक मनावर कायमचे कोरले जातात.* 
*जसे की २६ नोव्हेंबर ची काळरात्र* मुंबईत अतिरेक्यांचा हैदोस सुरू होता, मुंबई रोजच्या प्रमाणे धावत होती, काही कामगार, कर्मचारी, अधिकारी, घरी निघाले होते, रस्त्यावर नेहमीप्रमाणे वर्दळ होती, काही लोक रस्त्यावर खरेदी करत होते, तर काहीजण हॉटेलमध्ये जेवणाचा आस्वाद घेत होते, अचानक कुलाबा परिसरात स्फोट झाल्याचा आवाज आला, बाहेर स्पोटाच्या आवाजाने लोक सैरावैरा धावू लागले, काहीजण जागेवरच गतप्राण झाले होते, रस्त्यावरील दुकाने पटापट बंद झाली, सर्वत्र गोंधळाची स्थिती, लष्कर, पोलीस, अग्निशामक दल, डॉक्टर, आणि अनेक जण याप्रसंगी आपले मनोबल खच्ची होऊ न देता त्यांच्याशी आपापल्या परीने झुंजत होते, हे भीषण चित्र संपूर्ण जगासाठी नवे होते, दहशतवादाचा हा नवा विध्वंसक चेहरा होता, काहींनी पोलीस अधिकाऱ्यांना फोनवर घडलेला प्रसंग सांगितला,  पोलिसांनाही मोठ्या हल्ल्याची खात्री पटली, आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त मागवुन कार्यवाही सुरू केली, तसेच या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता प्रशासनाने निमलष्करी दल, आणि लष्कराच्या तुकड्यांना पाचरण केलं, या दहशतवादाच्या हल्ल्यातून *मुंबई कधी मोकळा श्वास घेते याकडे सगळ्या जगाचे लक्ष लागले होते,* त्यामध्ये १८३ निरपराध बळी गेले, त्यामध्ये अठरा पोलीस अधिकारी कर्मचारी शहीद झाले, सरकारने त्यांना आर्थिक मोबदला देऊन त्यांचे संसार सावरण्याचा प्रयत्न केला पण खरा मुद्दा हा आहे, की आपण असे प्रसंग आपणावर ओढडवणार नाहीत, याची काळजी घेण्यासाठी किती गांभीर्याने प्रयत्न करणार आहोत, दहशतवाद संपूर्ण जगासमोर एक समस्या बनली आहे, या *अतिरेक्यांना धर्म नसतो, जात नसते, त्यांचे लक्ष एकच असते अशांतता पसरावयाची* *अर्थव्यवस्थेला धोका पोहोचवायचा, आज भारत आशिया खंडातील नव्हे तर जागतिक नकाशावरील, एक सर्वात सुदृढ लोकशाही असलेले सार्वभौम राष्ट्र म्हणून ओळखले जाते.*
या मुंबई हल्ल्यातील अतिरेक्यांना जिवंत पकडण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी मुंबई पोलिसांनी केली, *या अतिरेकी हल्ल्यात ठाण्याचे सहाय्यक फौजदार तुकाराम ओंबळे शहीद झाले, अतिरेक्यांना जिवंत पकडण्याची ही जगातील पहिलेच घटना असल्याचे म्हटले जाते, पोलिसांच्या या पराक्रमी कामाबद्दल अनेकजण त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करीत होते, पण सहाय्यक फौजदार तुकाराम ओंबळे, अशोक कामटे हेमंत करकरे विजय साळस्कर हे वरिष्ठ अधिकारी शहीद झाले यांच्या बलिदानामुळे त्यांचे प्राण अर्पण आणि इतरांच्या प्रसंगावधानामुळे एका अतिरेक्याला जिवंत पकडणे शक्य झाले, त्यामुळे ते समाधानी असले तरी या  सहकाऱ्याचे प्राण गेल्याचे त्यांना अतोनात दुःख आहे.*
 *आपले आनंदाचे दिवाळी दसरा सारखे सण- समारंभ असतात, तेव्हा पोलिसांना ड्युटी असते, त्यांना आपले कर्तव्य बजावावे लागते, त्यांना कधीही सुट्टीचा आनंद घेता येत नाही, कुठल्याही खाजगी, स्वतःच्या कार्यक्रमात मनमोकळेपणाने वावरता येत नाही, कधी फोन येईल, याची सतत भीती असते,* 
लष्करातील कर्मचारी जीवाचे रान करून स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी न घेता जनतेच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र सीमेवर पहारा देत असतात, 
*स्वतःच्या कुटुंबाची काळजी न करता देश सेवेसाठी अहोरात्र झटत असलेल्या आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांना, त्यांच्या कार्याला सलाम ! शहीद पोलीस कर्मचाऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली* 🌸🌸🌸🙏🏻

✒️
*श्री. रवींद्र परशुराम वेदपाठक साखरवाडी ता. फलटण, जि. सातारा. फो.९९७०७४९१७७*

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form