समाजसेवक मुजम्मील कमलीवाले यांच्या वतीने नुतन नगराध्यक्षा डॉ.सौ. प्रणीती भालके मॅडम यांचा अनोख्या पद्धतीने सत्कार

पंढरपूर प्रतिनिधी -
नगराध्यक्षपदी डॉ. प्रणीती भालके यांची निवड झाल्याबद्दल समाजसेवक मुजम्मील कमलीवाले यांच्या वतीने पारंपरिक शाल, हार, बुके न देता एक अनोखा व समाजोपयोगी उपक्रम राबवून सत्कार करण्यात आला.
प्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
या उपक्रमाअंतर्गत नगरपालिकेच्या शाळेत नुतन नगराध्यक्ष डॉ. प्रणीती भालके यांच्या शुभहस्ते समाजसेवक मुजम्मील कमलीवाले यांच्या वतीने प्रथमोपचार पेटी देण्यात आली. लहान वयातच आरोग्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी आणि आपत्कालीन परिस्थितीत प्राथमिक उपचारांची सोय उपलब्ध व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

समाजहित जपणारा आणि पुढील पिढीच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणारा हा उपक्रम उपस्थितांकडून विशेष कौतुकास्पद ठरला. नगराध्यक्ष डॉ. प्रणीती भालके यांनीही या उपक्रमाचे स्वागत करत अशा सामाजिक उपक्रमांना नेहमीच प्रोत्साहन देण्याची भूमिका व्यक्त केली.
हा सत्कार केवळ अभिनंदनापुरता मर्यादित न राहता समाजासाठी उपयुक्त ठरावा, हीच भावना समाजसेवक मुजम्मील कमलीवाले यांनी यावेळी व्यक्त केली.
तसेच लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी नगरपालिकेतील शिक्षकांचा देखील सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला परिसरातील पालक, नागरिक, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते तसेच समाजसेवक मुजम्मील कमलीवाले उपस्थित होते. यावेळी बोलताना नगराध्यक्ष डॉ. प्रणीती भालके यांनी नगरपालिकेच्या शाळा टिकल्या पाहिजेत यासाठी आपण स्वतः विशेष प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. प्रत्येक शाळेला ज्या-ज्या गोष्टींची आवश्यकता आहे, त्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form