पत्रकारिता हा व्यवसाय नाही तर ती सामाजिक जबाबदारी आहे - उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत डगळे

पंढरपूर प्रतिनिधी --
पहिल्याच प्रयत्नात यु पी एस सी मध्ये पास होऊन पहिली पोस्टिंग विठ्ठलाच्या चरणी मिळाली यात खूप समाधान वाटले.पत्रकारिता दिन साजरा करताना मला सांगावस वाटते की पत्रकारिता हा व्यवसाय नसून ती एक सामाजिक जबाबदारी आहे.आपण जे युनिव्हर्सला मागू ते मिळते हा एक आकर्षणाचा नियम आहे.तसे आपल्या कार्यात यश मिळण्यासाठी आपण सकारात्मक प्रयत्न केले पाहिजेत असे प्रतिपादन पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांनी पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रमात केले.आपल्या प्रशिक्षण काळात अमरावती येथील जादूटोणा आणि आदिवासी जिवन,जलद पसरणाऱ्या अफवा  याबाबत आलेले अनुभव कथन केले.

सदर कार्यक्रम प्रसंगी पंढरपूर नगरपालिका मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी पत्रकारांना घरकुल योजने बाबत सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले.बाळशास्त्री जांभेकर यांच्या दर्पण वृत्तपत्रादिना निमित्ताने पत्रकार दिन कार्यक्रमाचे पंढरपूर पत्रकार संघ व सर्व नऊ संघाच्या वतीने एकत्रित आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार नंदकुमार देशपांडे होते.याप्रसंगी सर्व नूतन अध्यक्ष व पदाधिकारी यांचे सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.प्रमुख मान्यवरांचे स्वागत अमोल कुलकर्णी यांनी केले तर प्रास्तविक प्रवीण नागणे यांनी केले.महेश खिस्ते,हरिभाऊ प्रक्षाळे, श्रीकांत कसबे यांची मनोगते झाली.आभार सतीश बागल यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form