आनंदी बहूउद्देशीय सामाजिक संस्था, उपळाई बुद्रुक यांचेकडून सावित्रीबाई फुले जयंती साजरी

पॉसिबल एज्युकेशन अँड ट्रेनिंग सेंटर या शैक्षणिक मार्गदर्शन संस्थेचा लोकार्पण सोहळा संपन्न...
माढा प्रतिनिधी --
कार्यक्रमास उपस्थित माजी तालुका पंचायत सदस्य श्री.  दीपक आबा देशमुख, माजी सरपंच श्री. मनोज आबा गायकवाड, प्रा. नितीन सर झाडबुके, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष समर्थ आखाडे, दत्ता मंदिराचे ट्रस्टी श्री. गंगाराम महाराज, श्री. किरण शेंडे यांचा संस्थेचे अध्यक्ष श्री. मुस्तफा काझी यांचे हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षपद प्रा. नितीन सरांनी भूषवले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव डॉ. अतुल ज्ञानेश्वर क्षीरसागर यांनी केले. प्रस्ताविकेत त्यांनी सावित्रीबाईच्या जीवनावर प्रकाश टाकला. त्यांचबरोबर पॉसिबल एज्युकेशन अँड ट्रेनिंग सेंटर च्या 4 वर्षाच्या यशस्वी घोडदौड मध्ये 4 पुरस्कार व डॉक्टरेट मिळालेचे सांगितले. 

त्याचबरोबर 1 ऑफिसर आणि 20 पेक्षा जास्त विध्यार्थी स्कॉलरशिप मध्ये पास केले आहे. हे प्रकर्षाने सांगितले. 
नंतर संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांनी सत्कार करत इतर सदस्य उपाध्यक्ष अभिषेक गणेश महामुनी, सहसचिव सौ. कोमल अक्षय महामुनी, खजिनदार  सुयोग श्रीकांत क्षीरसागर, सदस्य - श्री. सागर विजय गाडेकर व श्री. राम गंगाधर जंगमवाड यांचे नामोल्लेख करून सत्कार केले. 

या कार्यक्रमाचे लक्षवेधक सूत्रसंचालन कु. प्रतीक्षा संजय भांगे व कु. अनुष्का गणेश उडगे यांनी केले. 
जयंतीनिमित्त भाषण स्पर्धेत सहभागी ईश्वरी डुचाळ, विश्वतेज देशमुख, सिद्धी शेटे, श्रावणी दसंगे, अनुष्का उडगे यांनी भाषण करून बक्षीस हीं मिळवले. 
त्यानंतर अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे 7 विध्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, त्यात ईश्वरी डुचाळ, विश्वतेज देशमुख, सिद्धी शेटे, श्रावणी दसंगे, अनुष्का उडगे, स्वराली शिंदे, प्रतीक्षा भांगे या सर्वांनी भाषण, हस्ताक्षर, निबंध, चित्रकला, स्कॉलरशिप व रांगोळी अशा विविध स्पर्धेत प्रविण्य पटकवले.

त्यानंतर NMMS 2024-25 च्या निखिल व्हरगळ, श्रावणी भांगे, ज्ञानेश्वरी डुचाळ, समर्थ काळे, ओम बेडगे, तेजस बेडगे, साक्षी गोरे, प्रेम कदम, पद्मनाभ दसंगे, प्रगती जाधव व नम्रता आखाडे अशा 11 यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र व बक्षीस देऊन पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. त्यानंतर माजी सरपंच मनोज आबा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणात्मक उपदेश दिले. त्यांच्या भाषणानंतर इतर बक्षिसे इतर स्पर्धाकांना बक्षिसे देण्यात आले यात शिवम शितोळे, शिवप्रसाद शिंदे, सिद्धवेद शेंडे, स्वराज शिंदे, आयुष डुचाळ, सर्वार्थ फुगे, शांभवी वास्ते, सुमित डुचाळ, ऋतुजा लाकुळे, प्रथमेश अष्टेकर, अथर्व वाघमारे व तनिष्का कोरके या 12 जणांचा समावेश होता. 

शेवटी अध्यक्षीय भाषण प्रा. नितीन सर यांचे प्रेरणात्मक भाषण झाले. त्यांच्या भाषण कौशल्यानी मुले मंत्रमुग्ध झाली. त्यांनी विविध पुस्तके, गोष्टी, अनुभव यांचा आढावा दिला. तसेच कार्यक्रमात उपस्थित मित्रमंडळी तानाजी जाधव, सिद्धेश्वर जाधव, संतोष डुचाळ, गणेश वास्ते, विष्णू कदम यांचे आभार मानले. शेवटी केक कापून आल्पोपहाराणे कार्यक्रमांची सांगता झाली.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form