पोस्ट ऑफिसच्या विविध योजनाचा लाभ घ्यावा:खा. धैर्यशील मोहिते-पाटील

खंडाळी वार्ताहर- मंगेश सोनार 
पोस्ट ऑफिसच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन माढा लोकसभाचे विद्यमान खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांनी मारकडवाडी, करोळे (ता. माळशिरस) व करमाळा तालुक्यातील आळजापूर, हिवरे,गवळेवाडी, येथे नव्याने सुरु झालेल्या पोस्ट ऑफिसच्या  उदघाटन प्रसंगी बोलताना केले. यावेळी प्रमुख उपस्थिती आ. उत्तमराव जानकर,आ. नारायणआबा पाटील, पंढरपूर चे डाकघर अधीक्षक मुन्ना कुमार, अस्सी. अधिक्षक एम. एम. पाटील, सरपंच विजया मारकड यांची होती.

 पुढे बोलताना खा.मोहिते-पाटील म्हणाले, माढा लोकसभा मतदार संघात  नवीन पोस्ट ऑफिस मंजुर झाल्यामुळे ग्रामीण भागातील जनतेची सोय झाली असून पोस्ट ऑफिसच्या विविध योजना खुप फायदेशीर आहेत त्याचा ग्रामस्थांनी लाभ घ्यावा असे आव्हान त्यांनी केले.
[]यावेळी आ. उत्तमराव जानकर म्हणाले, खासदार साहेबांनी पाठपुरावा करून माढा लोकसभा मतदार संघात  नवीन पोस्ट ऑफिस मंजूर करून आणली त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेची सोय होणार असून पोस्टाच्या विविध योजनांचा ग्रामस्थांनी लाभ घ्या असे ते म्हणाले. मतदार संघाच्या विकासासाठी मी व खासदार काटीबद्ध आहोत असे ते म्हणाले. यावेळी पोस्ट ऑफिस मारकडवाडी ग्रामस्थ व पोस्ट ऑफिस यांच्या वतीने खा.धैर्यशील  मोहिते पाटील व आ. उत्तमराव जानकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पंढरपूरचे पोस्ट मास्तर सोमनाथ गायकवाड, तक्रार निवारण चे सचिन इमडे,पोस्ट विमा अधिकारी सोमनाथ कोरके, माळशिरसचे पोस्ट मास्तर गोवे, नातेपुतेचे पोस्ट मास्तर पालीमुळे, सदाशिनगरचे पोस्ट मास्तर गोरे, माळशिरसच्या पोस्टल अस्सी. पुनम सोनार,मारकड वाडीचे  प्रभारी बी. पी. एम. प्रदीप वाघमोडे, महादेव भाले व समस्थ ग्रामस्थ मारकड वाडी मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form