पंढरपूर प्रतिनिधी-
पंढरपूर नगरपरिषद सभागृहामध्ये नूतन अध्यक्ष प्रणिता भालके यांनी स्व.आमदार भारत नाना भालके यांच्या प्रतिमेचे पूजन केले तद्नंतर पदभार स्वीकारला पदभार स्विकारताच त्यांनी पत्रकारांशी बोलताना सर्वांना विश्वासात घेऊन विकास कामे केली जातील असे त्यांनी म्हणाले.
संत नामदेव पायरी येथे श्री विठ्ठल रुक्मिणीसमोर नतमस्तक होऊन करून दर्शन घेतले. यानंतर तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगरसेवकासह वाजत गाजत त्या पंढरपूर नगरपरिषद येथे आल्यानंतर सभागृहात प्रवेश केला त्याप्रसंगी पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर त्यांनी नगराध्यक्ष दालनामध्ये जाऊन आपला पदभार स्वीकारला. यावेळी मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या हस्ते नगराध्यक्ष डॉ. भालके यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी पत्रकारांशी बोलताना नगराध्यक्ष भालके म्हणाल्या, पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीमध्ये तीर्थक्षेत्र विकास आघाडीने अजेंडा जाहीर केला होता; त्या अजंड्याप्रमाणे सर्व कामे करण्यात येणार आहेत. तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नगरसेवक व विरोधी गटातील नगरसेवक या सर्वांना बरोबर घेऊन विकासाची कामे करण्यात येणार आहे. यावेळी मनसे नेते दिलीप धोत्रे, भगीरथ भालके, अनिल सावंत,माजी नगरसेवक सुधीर धोत्रे व विविध पदाधिकारी कार्यकर्त उपस्थित होते.
नागरिकांच्या अडीअडचणी सोडण्यावर भर देण्यात येणार आहे. यामध्ये कोणतेही राजकारण करण्यात येणार नाही. पंढरपुरातील नागरिकांनी प्रेम करून भरभरून मते दिली आहेत. त्यांच्या विश्वासाला कोणताही तडा जाऊ नये, यासाठी आपण काम करणार आहे. पंढरपूर शहर धूळ व खड्डे मुक्त होण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून राज्यातील एक आदर्श तीर्थक्षेत्र म्हणून नावलौकिक करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.