सोलापूर प्रतिनिधी--
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची १९४ वी जयंती निमित्त त्यांच्या जन्मगावी यांच्या विचारांचा वारसा जपत सोलापूरातुन ६० महिला एकत्र येऊन त्यांना अभिवादन करण्यातसाठी नायगाव येथे दाखल झाल्या होत्या.त्याच्यां समवेत डॉ.माधूरी पारपल्लीवार,
डॉ.सौ.माधवी पोतदार या महिला प्रतिनिधींनी ३ जानेवारी 2026 ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्म गाव नायगाव येथे ६० महिलांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकास अभिवादन केले
ज्ञानज्योती सावित्रीबाईंची जयंती सत्कारणी लागावी तसेच फुले दांपत्यांनी महिलांना शिक्षण हा केंद्रबिंदू मानून संपूर्ण समाजाला नवा विचार,नवी गती देत सामर्थ्य,बुद्धिमत्ता व चातुर्य यांचे महत्व पटवून दिले.शिक्षणाच्या प्रवाहात जात असताना त्यावेळीची स्थिती व आत्ताची स्थिती फारशी वेगळी नाही. त्यावेळी सावित्रीबाई फुले ह्या ज्ञानज्योत बनून कार्य करत राहिल्या म्हणून आज सकारात्मक विचारांच्या माध्यमातून ज्ञानज्योत तेवत ठेवणे शक्य झाले आहे.ज्ञान ज्योती सावित्रीबाईंनी जो कणखरपणा आणि धाडस, धैर्य, जिद्ध, चिकाटी दाखवली तीच आज आपण दाखवणे आवश्यक आहे. या प्रेरणा घेऊन या महिला सदर कार्यक्रमासाठी गेल्या होत्या.
यावेळी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे जन्मगाव असलेल्या खंडाळा तालुक्यातील नायगाव येथील स्मारकास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.याप्रसंगी पालकमंत्री शंभूराज देसाई, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, आमदार अतुल भोसले, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी आदी उपस्थित होते.