कोल्हापूर च्या सुवर्ण कन्येची दिल्ली च्या कर्तव्य पथ वर निवड -- कु. सृष्टी वेदपाठक हिचा बहुमान

सोलापूर प्रतिनिधी - कोल्हापूर व सोलापूर येथील प्रसिद्ध सराफ व्यावसायिक आदरणीय श्री विवेक वेदपाठक यांची सुकन्या आणि महावीर कॉलेजची विध्यार्थिनी तथा सिनियर अंडर ऑफिसर कु. सृष्टी विवेक वेदपाठक हिची 26 जाने वारी 2026 रोजी नवी दिल्लीतील कर्तव्य पथ संचालनासाठी पंतप्रधान रॅली करिता निवड झाली. ही संपूर्ण महाराष्ट्र आणि सोनार समाजासाठी अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची बातमी आहे. कु. सृष्टीने आपल्या कर्तृत्वाने आणि शिस्तबद्ध कामगिरीने हे सर्वोच्च यश मिळविले आहे. कर्तव्य पथ वरील संचलनात सहभागी होणे हा प्रत्येक एन सी सी कॅडेट साठी सर्वोच्च सन्मान मानला जातो.
कु. सृष्टीच्या या दैदिप्यमान यशाबद्दल कोल्हापूर -सोलापूर येथील प्रसिद्ध सराफ तथा संत नरहरी समाधी मंदिर समितीचे माजी अध्यक्ष तथा विध्यमान जेष्ठ विश्वस्त आदरणीय श्री. भारतराव कारीकर, सोनार समाज संस्था सोलापूर चे अग्रणी प्रवर्तक सर्वश्री मोहन मंद्रूपकर, संजय मैंदर्गीकर, संतोष कळमणकर, अध्यक्ष वसंत पोतदार, उपाध्यक्ष विजयकुमार पोतदार, सचिव दत्तगुरु वेदपाठक, सहसचिव गिरीश जमखंडीकर, खजिनदार गजानन सोनार संचालक इंजिनियर विजयकुमार पोतदार, इंजिनियर रुद्रप्पा दोडमनी, प्रा. डॉ. अमर दीक्षित, सौं. चित्रा पोतदार यांचेकडूनतिचे अभिनंदन करून कौतुक, गौरव करण्यात येत आहे. कु. सृष्टी वेदपाठक हिचे यश संपूर्ण सोनार समाजासाठी अभिमानास्पद असून तीची ही जिद्द तरुण पिढी साठी प्रेरणादायी आहे आणि दिल्लीतील कर्तव्य पथ वर तिचे पाऊल पडणे व पंतप्रधान रॅलीत समावेश होणे हा सोनार समाजाचा बहुमान असल्याचे अध्यक्ष वसंत पोतदार यांनी म्हटले आहे. या निवडीबद्दल सर्वांनी अभिनंदन करून तिच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form