कर्तृत्ववान नेतृत्व आणि भक्तीचा वारसा - उमेश रंगनाथअण्णा कुरुलकर* वाढदिवसानिमित्त विशेष गौरव लेख

 पंढरपूर प्रतिनिधी -          
सोलापूर चे ग्राम दैवत श्री. शिवयोगी सिद्धेश्वर महाराज आणि सोनार समाजाचे कुलदैवत श्री. कालिकादेवी  यांच्या आशीर्वादाने समाजहीत व धार्मिक कार्यासाठी स्वतःला वाहून घेणारे व्यक्तिमत्व म्हणजे श्री. कालिका देवी मंदिर समितीचे विद्यमान अध्यक्ष श्री. उमेशजी रंगनाथअण्णा कुरुलकर ! आपल्या कार्यकाळात समाज कार्याला आणि मंदिराच्या विकासास एक नवी दिशा दिली आहे.
*धार्मिक कार्याचा झंजावात*. 
श्री उमेशजी कुरुलकर यांच्या नेतृत्वाखाली मंदिरात केवळ धार्मिक विधीच होत नाहीत, तर ते उत्सवाचे सोहळे बनले आहेत. दरवर्षी गोकुळाष्टमी, ज्ञानेश्वरी पारायण, आणि नवरात्री उत्सवात सप्तशती ग्रंथाचे पठन, नवचंडी यज्ञ अत्यंत भक्तीभावाने साजरे होतात. विशेषतः गुढीपाडव्यापासून ते पंचमी पर्यंत मंदिरात विविध कार्यक्रमाची रेलचेल असते.चैत्रशुद्ध पंचमीच्या दिवशी निघणारी श्री. कालिका देवींची भव्य पालखी मिरवणूक हा सोलापूर पांचाळ सोनार समाज बांधवासाठी एक आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. श्रीं. उमेशजी कुरुलकरांच्या सूक्ष्म नियोजनामुळे पंचमीचा हा मुख्य सोहळा अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध रीतीने संपन्न होतो, ज्यातून त्यांच्या कुशल व्यवस्थापनाची प्रचिती येते.
*मानाचे प्रतिनिधी मानकरी आणि सामाजिक बांधिलकी* .
सोलापूर शहराचे ग्रामदैवत श्री. शिवयोगी सिद्धेश्वर यांच्या यात्रेचे श्री. विश्व ब्राह्मण समाज कालिका सेवा मंडळ ट्रस्ट A/250 ही  संस्था   पांचाळ सोनार समाजाची आहे   सोनार समाजाला श्री सिद्धरामेश्वर यात्रेतील सात 
नंदीध्वजा पैकी नंबर चार व नंबर पाच  नंदिध्वज हे मानाचे आहेत. संस्था  हिच मालक व मानकरी आहे. व्यक्तिशः  कोणीही  नाही. संस्थेचे  प्रतिनिधी
  म्हणून त्यांना मान मिळाला आहे . हे त्यांच्या निस्वार्थी सेवेचे आणि भक्तीचे फळ आहे. धार्मिक कार्यासोबतच पुढच्या पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी विध्यार्थी गुण गौरव सोहळा सुरु ठेवला. गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना शिक्षणासाठी बळ देणे हा त्यांचा उपक्रम अत्यंत स्तुत्य आणि कौतुकास्पद आहे. 
*वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा*.
आज  5 जानेवारी रोजी श्री. उमेशजी कुरुलकर यांचा वाढदिवस आहे. त्यांचा शांत, संयमी, आणि कष्टाळू स्वभावामुळे त्यांनी समाजात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांना उत्तम आरोग्य दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्या हातून अशीच समाज सेवा आणि धर्म सेवा घडत राहो हीच श्री. कालिका माता आणि श्री. शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांच्या चरणी प्रार्थना!.
*वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा*.
            🌹🌹🌹🌹
---- वसंत पोतदार सोलापूर ------- 
मोबाईल 94230 65915

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form