आचार्य बाळशास्त्री यांचा आज स्मृतिदिन... मराठी पत्रकारितेचे जनक, दर्पणकार

मराठी पत्रकारितेचे जन्मदाते, भाषाशास्त्रज्ञ, इतिहासकार, हिंदी भाषेचे प्राध्यापक, खगोल शास्त्रज्ञ आचार्य, शुद्धीकरण चळवळीचे आग्रही आचार्य बाळशास्त्री यांचा आज स्मृतिदिन.
भारतीय स्वातंत्र्यलढयाचे त्याचे कार्य बहुमोल होते १८४० मध्ये त्यांना 'जस्टीस ऑफ द पीस' हा बहुमान मिळाला.ते सुप्रीम कोर्टाच्या ग्रँड ज्युरी मध्ये बसू शकत होते. श्रीपती शेषाद्री धर्मांतर प्रकरणी शेषाद्री यांना पुन्हा हिंदू धर्मात आणण्यासाठी बाळशास्त्री जांभेकर यांनी १८४३ मध्ये लढा दिला. त्यांनी आपली बाजू सुप्रीम कोर्टात पर्यंत जाऊन मांडली आणि शेषाद्री यांना न्याय मिळवून दिला. त्यामुळे त्यांना धार्मिक बहिष्कार सामोरे जावे लागले.

आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे बहुभाषा कोविद होते. त्यांना मराठी, संस्कृत, हिंदी, गुजराती, कानडी, तेलगू, बंगाली, पारशी, इंग्रजी, ग्रीक अशा अनेक भाषेवर त्यांचे प्राविण्य होते. त्याचप्रमाणे अंकगणित बीजगणित भूमिती या विषयात बाळशास्त्री यांना अधिक गती होती ते त्या विषयांचे अध्यापन देखील करत होते. बाळशास्त्री यांनी भारतातील पहिले अध्यापक विद्यालय १८४५ मध्ये मुंबईत सुरू केले. तेच त्याचे पहिले संचालक होते. याच वर्षी त्यांनी 'ज्ञानेश्वरी' हा ग्रंथ सर्वप्रथम शिळा प्रेसवर मुद्रित केला.

बाळशास्त्री जांभेकर यांनी अनेक संस्थांची निर्मिती केली. वाड्मय मंडळ, विज्ञान मंडळ, पहिले वसतिगृह त्यांनी सुरू केले. मुंबईच्या कुलाबा वेधशाळेचे संचालक म्हणूनही काही काळ काम केले. पुरातत्व विभागा
संदर्भात त्यांनी अतिशय मोलाचे काम केले. भारतीय इतिहास, शिलालेख, ताम्रपट, पुरातन आणि चित्रलिपी यावर संशोधन करून त्यांचे संशोधित लेख त्यांनी इंग्रजीतून प्रकाशित केले. पहिला मराठी शब्दकोश आणि मराठी भाषेचे व्याकरण या पुस्तकाचे संपादन आणि भाषांतर बाळशास्त्री यांनीच केले.

जांभेकरांनी सार्वजनिक ग्रंथालयांचे महत्त्व ओळखून त्यांनी बॉम्बे नेटिव्ह जनरल लायब्ररीची स्थापना केली. दर्पण या वृत्तपत्राने पत्रकारितेचा पाया रचला. अनेक संशोधनपर लेख लिहिले.
                   अशा या बृहस्पती बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतींना विनम्र वंदन.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form