संत नरहरी सोनार समाज सेवा मंडळाच्या अध्यक्षपदी मिलिंद पंडित तर उपाध्यक्षपदी
नितीश वेदपाठक
सोलापूर प्रतिनिधी--
संत नरहरी सोनार समाज सेवा मंडळ, विजापूर रोड, सोलापूर या समाजसेवी संस्थेची
पंचवार्षिक सर्वसाधारण सभा सुंदर मल्टिपल हॉल,नेहरूनगर, सोलापूर येथे मोठ्या
उत्साहात व शांततेत पार पडली.
यावेळी संस्थेच्या नूतन कार्यकारणी पदाधिकारी सदस्यांची निवड करण्यात आली यामध्ये
अध्यक्ष मिलिंद पंडित,उपाध्यक्ष नितीश वेदपाठक,सचिव प्रशांत महामुनी,सहसचिव सोमनाथ
पंडित,खजिनदार मयूर वेदपाठक, सहखजिनदार धनंजय तपासे,सदस्य श्री.सुकांत हिलाले.अमोल
दीक्षित,हरिप्रसाद धर्माधिकारी,विनायक पोतदार, सुजित पोतदार,गुरुनाथ
भास्करे,स्वप्नील पोतदार. राजेंद्र पोतदार याची निवड करण्यात आली.
तसेच याप्रसंगी
ज्येष्ठ मार्गदर्शन व सल्लागार विनायक कव्हेकर. चंद्रकांत वेदपाठक,चंद्रशेखर
कव्हेकर,दिपक वेदपाठक. विनोद पोतदार,रवींद्र दीक्षित, गिरीश जमंखडीकर यांच्या
उपस्थितीत सर्वांनुमते निवड करण्यात आली. यावेळी मावळते अध्यक्ष विनायक कव्हेकर
यांनी मंडळाच्या आजवरच्या कार्याचा आढावा घेत नुतन कार्यकारणी जाहीर केली.तर
मंडळाचे जेष्ठ मार्गदर्शक चंद्रकांत वेदपाठक यांनी सर्व सदस्यांचे स्वागत केले व
मंडळाचे सचिव प्रशांत महामुनी यांनी सर्वाचे आभार मानले.

