मकरसंक्रांत निमित्त मातृ प्रबोधनार्थ महिला मेळावा

*ऑदर्श माता पालक यांचा सत्कार सोहळा*
लातूर प्रतिनिधी - (राम रत्नपारखी) मकरसंक्रांत निमित्त पेठवडज येथे मातृ प्रबोधन महिला मेळावा व आदर्श माता पुरस्कार मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन सौ जना ताई शिवाजीराव नाकाडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष उषाताई संभाजी राव नाईक सामाजिक कार्यकर्त्या, प्रमुख पाहुणे सौ.उज्वला बालाजीराव गुरसुडकर जिल्हा अध्यक्ष पोलीस मित्र संघटना नांदेड, व कार्यक्रमाचे उद्घाटक विजयाताई धोंडू राम देबडवार लोकनियुक्त नगराध्यक्ष, न.प. मुखेड या होत्या... आम्ही साऱ्या जणी, घालू आकाशाला गवसणी जागर जाणीवाचा सन्मान तुमच्या माझ्या लेकीचा... मन्याड खोऱ्यातील जिजाऊ, सावित्रीचा वसा घेतलेल्या हिरकणींचा, रणरागिणींचा सन्मान.. मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरण मकरसंक्रांत निमित्त आयोजित कार्यक्रमात महिलांचा मोठा सहभाग होता तर सचिव सौ. जनाबाई शिवाजीराव नाकाडे व समस्त शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद शिवाजी नाकाडे पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पेठवडज यांची उपस्थिती होती आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी यांनाही आवार्जुन सदर कार्यक्रमास उपस्थित होती

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form