जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर शशिकांत हरिदास दीपक इरकल,नंदकुमार
देशपांडे,संतोष उपाध्ये यांची नियुक्ती
पंढरपूर प्रतिनिधी -- सोलापूर जिल्हा
ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकीय सदस्य म्हणून शशिकांत हरिदास दीपक इरकल,नंदकुमार
देशपांडे, संतोष उपाध्ये यांच्यासह अ. भा.ग्राहक पंचायतीच्या नऊ जणांची नियुक्ती
जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात आली. *सुधारित ग्राहक संरक्षण कायदा २०१९* नुसार
*प्रत्येक जिल्ह्यात ग्राहक संरक्षण परिषदेची स्थापना* करावी अशी त्यात तरतूद
आहे. त्यानुसार *आपल्या जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी अखिल भारतीय ग्राहक
पंचायतीच्या* सदस्यांची जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर "अशासकीय सदस्य" म्हणून
नियुक्ती केली आहे. ग्राहकांचे प्रश्न,समस्या,अडचणी तातडीने सुटाव्या यासाठी
ग्राहक संरक्षण कायद्याने हे व्यासपीठ उपलब्ध केले आहे.व त्यामध्ये नागरीकांना
सातत्याने दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी सोडविल्या जाव्यात असे अभिप्रेत आहे.
जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखालील या ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकीय सदस्य
म्हणून शशिकांत हरिदास,दीपक इरकल,सौ माधुरी परदेशी,नंदकुमार देशपांडे,शशिकांत
नरोटे,ऍड.विजय कुलकर्णी, संतोष उपाध्ये,दत्तात्रेय कुलकर्णी,राजन घाडगे यांची तर
जिल्हा पोलीस प्रमुख,उप प्रादेशिक परिवहन अधिकारी,सहायक आयुक्त अन्न,औषध
प्रशासन,जिल्हा माहिती अधिकारी,अधिक्षक अभियंता महावितरण,अधिक्षक अभियंता
दूरसंचार, उपनियंत्रक वैधमापन, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी,विभाग नियंत्रक राज्य
परिवहन महामंडळ,जिल्हा आरोग्य अधिकारी,जिल्हा शल्य चिकित्सक,जिल्हा परिषदेचे
उपमुख्य कार्यकारी अधिकारी इत्यादी खात्याचे जिल्हा स्तरावरील अधिकारी शासकीय
सदस्य म्हणून नियुक्त केलेले असतात. सदस्य सचिव म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी हे
काम पाहतात. या निवडीबद्दल अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे प्रांत अध्यक्ष
बाळासाहेब औटी, संघटन मंत्री संदीप जंगम,प्रांत सदस्य विनोद भरते,माजी प्रांत
सदस्य सुभाष सरदेशमुख,जिल्हा उपाध्यक्ष विनय उपाध्ये यांनी अभिनंदन केले.
