एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे आंतरराष्ट्रीय संशोधन परिषदेचा गौरवशाली समारोप

पंढरपूर प्रतिनिधी-- 
 एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे आयोजित इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन इंटेलिजंट कम्प्युटिंग अँड व्हिजन टेक्नॉलॉजीज-२०२५ या आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. ही परिषद इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग तसेच कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग डिपार्टमेंट , एस के एन कॉलेज ऑफ इंजीनियरिंग कोर्टी पंढरपूर  आणि स्कूल ऑफ कॉम्प्युटेशनल सायन्सेस, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती.  अशी माहिती डॉ.अल्ताफ मुलाणी  यांनी दिली. 
कार्यक्रमाची सुरुवात उपप्राचार्य डॉ.स्वानंद कुलकर्णी यांच्या स्वागतपर भाषणाने  झाली.समारोप समारंभाच्या प्रस्तावनेमध्ये त्यांनी सांगीतले की, भारतातूनच नव्हे तर सात वेगवेगळया देशातून या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी शोधनिंबध सादर झालेले आहेत. यामध्ये इंटेलिजंट कम्प्युटिंग अँड व्हिजन टेक्नॉलॉजीज यांचे वेगवेगळे उपयोग व वापर तसेच वेगवेगळया केसस्टडीज यांचा समावेश आहे. हे सर्व शोधनिबंध साईटप्रेस-स्कोपस इंडेक्स या नियतकालिकामध्ये प्रकाशित करण्यात येणार असल्याची ही माहिती दिली.
या समारंभास प्रमुख पाहुण्या म्हणून प्रा. (डॉ.) सुमन लता त्रिपाठी (पुणे) उपस्थित होत्या. तसेच डॉ. अनिल पिसे (दक्षिण आफ्रिका), प्रा. (डॉ.) के. एम. एस. वाय. कोनारा (श्रीलंका) आणि डॉ. एम. एस. खराडे (पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर) हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते.  या सर्व मान्यवरांचा परिचय करुन देऊन सत्कार करण्यात आला. 

समारोपप्रसंगी मान्यवरांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग आणि कॉम्प्युटर व्हिजन या क्षेत्रांचे भविष्यकालीन महत्त्व अधोरेखित केले. संशोधक, प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी नवोपक्रम, आंतरविषयक संशोधन आणि वास्तव समस्यांवर आधारित संशोधनावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच एआय तंत्रज्ञान, इव्हॉवींग ग्रीडस, जनरेटिव्ह एआय, फींनफेट डिझाईन, या विषयावर विशेष भर दिला गेला. तसेच प्रा. डॉ. पास्टर आर. आर्ग्युएलेस (फिलिपियन्स) यांनी पोलूशन फ्री एनव्हायरमेंट फ्रेंडली सॅनीटरी नॅपकीन व डॉ. मोहनलाल कोल्हे, नॉर्वे यांनी टेक्नो इकॉनोमिक परफॉर्मन्स एवोल्युशन ऑफ फोटोव्होल्टेक बेस्ड मायक्रोग्रीड या विषयावर व्याख्यान दिले. कार्यक्रमादरम्यान सहभागी संशोधकांनी परिषदेबाबत आपले अनुभव व्यक्त करत सिंहगड संस्थेचा संशोधन क्षेत्रातील शैक्षणिक दर्जा, आंतरराष्ट्रीय सहभाग, आंतरराष्ट्रीय परिषदेचे उत्कृष्ट आयोजन व शिस्तबद्ध नियोजन ,सर्व पाहुणचार याबद्दल समाधान व्यक्त केले. 
यावेळी प्राचार्य व संचालक प्रा. डॉ. कैलाश जगन्नाथ करांडे यांनी उपस्थितांना संबोधित करत परिषदेच्या यशस्वी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले व संयोजक डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. नामदेव सावंत, आणि इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन इंटेलिजंट कम्प्युटिंग अँड व्हिजन टेक्नॉलॉजीज-२०२५ यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल संपूर्ण आयोजन समितीचे अभिनंदन केले.समारोप समारंभात उत्कृष्ट संशोधन निबंध व सादरीकरणांसाठी पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला.  कार्यक्रमाचा समारोप डॉ. एस. डी. राऊत (पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर) यांच्या आभार प्रदर्शनाने झाला. त्यानंतर छायाचित्र सत्र व प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.

आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी होणेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश जगन्नाथ करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, डॉ. ए. आर. शिंदे (प्रभारी संचालक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर), परिषदेचे समन्वयक डॉ.आर.एस. मेंते( पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ ,सोलापूर), संजोयक डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ.नामदेव सावंत, पब्लिकेशन डिन डॉ. संपत देशमुख, सह-संयोजक प्रा. स्वप्निल टाकळे, प्रा.संदीप लिंगे , तसेच सर्व विभाग प्रमुख , सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सह-संयोजक म्हणून प्रा.स्वप्निल टाकळे व  प्रा.संदीप लिंगे यांनी काम पाहीले. या परिषदेचे सूत्रसंचालन प्रा. वैष्णवी उत्पात यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठ, सोलापूरचे कुलगुरु डॉ. प्रकाश महानवर,उपकुलगुरु डॉ.लक्ष्मीकांत दामा व डॉ. पी. एन. कोळेकर (समन्वयक,पीएम-उषा) यांनी  सिंहगड इन्स्टिटयूट, पंढरपूर येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उल्लेखनीय कामगीरीबददल कौतुक केले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form