मतमोजणीसाठी 12 टेबल,मतमोजणीच्या 9 होणार फेऱ्या,सकाळी10 वा. मतमोजणी वाजता सुरू होणार
पंढरपूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान पार पडले तसेच प्रभाग क्रमांक 7 ब मध्ये 20 डिसेंबर रोजी मतदान घेतले जाणार असून 21 डिसेंबर रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदान व मोजणीसाठी निवडणूक प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून प्रशासन सज्ज असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सीमा होळकर यांनी दिली.
पंढरपूर नगरषिदेच्या 18 प्रभागाच्या मतमोजणीसाठी 12 टेबलवर मतमोजणी होणार असून, मतमोजणीच्या 09 फेऱ्या होणार आहेत. प्रत्येक टेबलवर एक पर्यवेक्षक व एक सहा.मतमोजणी अधिकारी असे दोन व त्यांच्या मदतीला एक शिपाई याप्रमाणे एकूण तीन कर्मचारी असणार आहेत. मतमोजणी प्रक्रियेसाठी 53 अधिकारी व कर्मचारी तसेच अधिकचे 20 कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. प्रत्येक फेरीतील मोजणी अंदाजे 30 मिनिटात संपणार आहे. मतमोजणी केंद्रात मोबाईलच्या वापरास प्रतिबंध करण्यात आला आहे. ज्या व्यक्तींकडे निवडणूक विभागामार्फत प्रवेशासाठी पास देण्यात आला त्यांनाच मतमोजणी केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे. प्रसार माध्यम प्रतिनिधींना फक्त पत्रकार कक्षात मोबाईल वापरास परवानगी असून, मतमोजणी केंद्रात मोबाईल वापरास बंदी आहे. प्रवेश देताना पोलीस प्रशासनामार्फत तपासणी केली जाणार आहे.असेही निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर यांनी सांगितले.
प्रत्येक टेबलवरील मतमोजणी व्हिडीओ चित्रीकरण करण्यासाठी सी.सी. टिव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली असून, मतमोजणी केंद्रात व्हिडीओ चित्रीकरण करणारे फिरते पथकेही कार्यरत राहणार आहेत. मतमोजणी प्रक्रिया शासकीय धान्य गोदाम, पंढरपूर येथे रविवार दि. 21 डिसेंबर रोजी सकाळी 10.00 वाजता सुरू होणार आहे. मतमोजणी व्यवस्था, निकाल संकलनासाठी आवश्यक व्यवस्था, स्ट्रॉगरुमवर देखरेख, संकलन आदीबाबतचे निवडणुक नियुक्त अधिकारी-कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले असल्याची माहिती सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली.
0000000000