*श्री क्षेत्र माळेगाव मल्हारी मार्तंड खंडोबा मंदिरात सुरक्षा बंदोबस्त तैनात*


पोलिस, अधीक्षक, निरिक्षक, व होमगार्ड यंत्रणा हजारो च्या संख्येने सहभागी झालेले आहेत. तसेच मंदिर परिसरात  गाभाऱ्यात पोलिस मित्र संघटना नवी दिल्ली भारत नांदेड जिल्हा टीम कार्यरत आहेत.
सौ. उज्वला गुरसुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत टीम सज्ज
नांदेड प्रतिनिधी
 नांदेड जिल्हा वृत्त दक्षिण महाराष्ट्र मराठवाडा विभागात सर्वात मोठी यात्रा म्हणून प्रसिद्ध असलेली  माळेगाव यात्रा प्रतिवर्षी मोठ्या उत्साहात साजरी होते.  या पार्श्वभूमीवर तसेच नांदेड जिल्ह्यात  माळेगांव यात्रेत सुरक्षा बंदोबस्त म्हणून पोलीस मित्र टीम तैनात करण्यात आलेली आहे या टीमला सज्ज करण्याचा निर्णय निर्णय सौ. उज्वला गुरसुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला आहे. हा यात्रा महोत्सव  मोठ्या उत्साहात साजरा करण्यात करण्यात येत आहे. खंडोबाची मुख्य पूजा जागरण इत्यादी अनेक गोष्टी आणि इतर धार्मिक कार्यक्रम खंडोबा मोठ्या उत्साहात पार पडतं आहेत. श्री क्षेत्र माळेगाव मल्हारी मार्तंड खंडोबा मंदिर  अतिशय पुरातन काळाचे असल्याने येथे प्रतिवर्षी  डिसेंबर अखेरीस इथे मोठी यात्रा भरते. विविध राज्यातून या यात्रेत  अनेक प्रकारचे व्यापारी सहभागी होतात. 10 दिवस चालणाऱ्या या यात्रेत सुरक्षा रक्षक म्हणून पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत नांदेड जिल्हा संघटनेला या सुरक्षा बंदोबस्ताचा या वर्षी बहुमान मिळाला आहे.
      सविस्तर वृत्त असे की या यात्रेला लातूर हुन देखील मोठ्या संख्येने भाविक आणि व्यापारी येत असतात. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सतर्कता म्हणून यंदा देखील माळेगाव यात्रेत पोलिस व होमगार्ड यंत्रणा हजारो च्या, संख्येने उपस्थित केली गेली आहे. पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत यांच्या माध्यमातून मंदिर परिसरात व गाभाऱ्यात सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जेणेकरून भाविकांना सुरक्षिततेसाठी कुठल्याही प्रकारची कमतरता भासू नये. चोरांपासून बचाव  व दर्शनासाठी सुलभता व्हायला हवी यासाठी पोलीस मित्र टिम कार्यरत   करण्याचा निर्णय नांदेड जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा सौ. उज्वला बालाजीराव गुरसुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिरांचे ट्रस्ट मंडल आयोगाच्या माध्यमातून घेतला आहे. माळेगावच्या यात्रेला राजश्रय देखील आहे. माळेगावचा खंडोबाराया काँग्रेसचे दिवंगत नेते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे कुल दैवत आहेत. हयात असतांना विलासराव देशमुख दरवर्षी यात्रेला येत असतं. आता ही दरवर्षी विलासराव यांचे सुपुत्र धीरज देशमुख यात्रेला येतात. गेल्या  अनेक वर्षापासून यात्रा मोठ्या उत्साहात होत आहे. त्याच अनुषंगाने या वर्षी  दि. 18 डिसेंबर 2025 ते 28 डिसेंबर 2025 पर्यंत चालू आहे. महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभाग श्री क्षेत्र माळेगांव मल्हारी मार्तंड खंडोबा मंदिरात पोलिस मित्र संघटना नवी दिल्ली भारत टीम नांदेड  सेवेसाठी दि. 18 डिसेंबर ते 28 डिसेंबर पर्यंत कार्यरत आहे...

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form