दहाव्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत**पुण्याच्या कु. आद्या सचिन घोडके हिला रौप्य (रजत) आणि कांस्य पदक*
नाशिकरोड (प्रतिनिधी) -
नागपूर येथे 'नॅशनल शोटोकन कराटे असोसिएशन इंडिया' (एनएसके आय) तर्फे दिनांक ६ ते ७ डिसेंबर २०२५ दरम्यान आयोजित 'दहाव्या राष्ट्रीय कराटे स्पर्धे'त पुण्याच्या फुरसुंगी येथील कु. आद्या सचिन घोडके हिने एक रौप्य (रजत) पदक आणि एक कांस्य पदक पटकावले. या स्पर्धेत भारतातील सात राज्यांतील ९०० हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या यशाबद्दल कु. आद्या सचिन घोडके हिचे तसेच अन्य विजेत्या खेळाडूंचे सकल भारतीय सोनार समाज संघटन, सकल ओबीसी सेतुबंधन, युनिव्हर्सल विश्वकर्मा वंशज फाउंडेशन इंटरनॅशनल, वंशावळी डॉट कॉम (पुणे), तसेच सेतुबंधनमधील संपूर्ण भारतात कार्यरत असलेल्या विविध सोनार समाज संस्था आणि संघटना यांच्यातर्फे अभिनंदन करण्यात आले आहे. पुण्यातील शैक्षणिक वर्तुळातून देखील तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सातवर्षीय कु. आद्या सचिन घोडके ही फुरसुंगी (पुणे) येथील शिवशंभो कराटे अकॅडमीमध्ये कराटे प्रशिक्षण घेतले असून, ती श्री साई इंग्लिश मीडिअम स्कूलची विद्यार्थिनी आहे. कु. आद्या ही फुरसुंगी (पुणे) येथील लक्ष्मी टेलिकॉम मध्ये नोकरीस असलेले श्री. सचिन यशवंत घोडके आणि प्राथमिक शिक्षिका सौ. नेहा सचिन घोडके यांची सुपुत्री आहे.
नागपूर येथील नॅशनल शोटोकन कराटे स्पर्धेत कु. आद्या सचिन घोडके हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून एक रौप्य (रजत) पदक आणि एक कांस्य पदक पटकावले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्राचे महसूलमंत्री तसेच नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. यावेळी कु. आद्या हिचा इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये नामांकन झाल्याबद्दल स्पर्धेचे आयोजक श्री. संजय इंगोले यांनी सुवर्णपदक आणि सन्मानचिन्ह देऊन विशेष सन्मान केला.
शिवशंभो स्पोर्ट्स अकॅडमीचे संस्थापक आणि प्रमुख कराटे प्रशिक्षक श्री. शिवा बबलाद आणि कराटे प्रशिक्षक आर्या बारवकर यांच्याकडून कु. आद्या सचिन घोडके हिने कराटे प्रशिक्षण घेतले आहे.