*सोलापूर सोनार समाज संघटनेचे माजी अध्यक्ष श्री. सुनील पंडित यांचे आवाहन*.
सोलापूर प्रतिनिधी --
येथील सोनार समाज संस्थे तर्फे आयोजित करण्यात आलेल्या समाज गौरव सोहळा व शासकीय योजना माहिती शिबीर कार्यक्रमाला समाज बांधवानी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सोनार समाज संघटनेचे माजी अध्यक्ष श्री. सुनिल पंडित यांनी केले आहे. रविवार दिनांक 28 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता विजयपूर रोड वरील निर्मिती लॉन्स येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
श्री सुनील पंडित यांनी आपल्या आवाहनात पुढे म्हटले आहे की, "हा कार्यक्रम केवळ मनोरंजनासाठी नसून समाजातील गुणवंतांचा सन्मान आणि समाजाच्या आर्थिक विकासासाठी आवश्यक असलेल्या संत नरहरी आर्थिक विकास महामंडळ, पी. एम. विश्वकर्मा योजना, पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनांची माहिती मिळवण्याची सुवर्ण संधी आहे."
समाजातील प्रत्येक घटकाने विशेषतः युवक आणि महिलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात यावे. असे आवाहन त्यांनी केले आहे.