पंढरपूर प्रतिनिधी--
पंढरपूर येथील डॉ काणेज गायत्री सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल मध्ये ८० वर्षाच्या पुरुष रुग्णांवर अतिशय गुंतागुंतीची कॅन्सर शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार होऊन आज तो रुग्ण ठणठणीत बरा झाला आहे.अत्यंत जोखमीची ही शस्त्रक्रिया सलग आठ तास सुरू होती. डॉ वर्षा काणे व त्यांच्या टिमने यांनी सदरची शस्त्रक्रिया पार पाडली.
याविषयी अधिक माहिती सांगताना सर्जन डॉ वर्षा काणे यांनी सांगितले,२०दिवसांपूर्वी पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागात राहत असलेला एक कॅन्सर पीडित रुग्ण दाखल करण्यात आला.त्या रुग्णाला मूत्राशयाचा कॅन्सर झालेला होता,ट्युमर एवढा मोठा होताअत्यंत जोखमीचे
ऑपरेशन आठ तास सुरू होते. तीन ठिकाणी भूल देऊन ऑपरेशन करण्यात आले.लघवीच्या पिशवीतच कॅन्सरची गाठ असल्याने किडनी कडून आलेल्या नळ्या वळविण्यात आल्या,आतड्याचा तुकडा काढून नवीन मूत्राशय, मूत्रमार्ग तयार करण्यात आला, आणि मग कॅन्सरग्रस्त भाग काढून टाकण्यातआला.अत्यंत
जोखमीची ही शस्त्रक्रिया होती, यानंतर हॉस्पीटल
मध्ये शस्त्रक्रियेनंतर रुग्णां व्यवस्थित सर्व तपासणी व त्यानां होणारा त्रास यातुन सुटका केली असून रुग्ण ठणठणीत बरा होऊन आनंदाने घरी गेले.
याचबरोबर डॉ काणेज गायत्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये रविवार दि१४डिसेंबर रोजी युरोलोजीची आठ ऑपरेशन्स शासकीय योजनेतून करण्यात आली, प्रोस्टेट ग्रंथीची चार आणि मुतखड्याची चार अशी आठ ऑपरेशन्स करण्यात आली, विशेष म्हणजे हे सर्व पेशंट सत्तर वर्षाच्या पुढचे होते,यातील दोन पेशंट्स ना शुगर, बीपी चा त्रास होता तर एका पेशंटची अँजिओप्लास्टी एकाची बायपास सर्जरी झाली होती.एका पेशंटच्या किडनीत ४२मिमी एवढा मोठा खडा निघाला,तर तिसऱ्या पेशंटच्या मूत्राशयात एकूण ९२खडे निघाले, ही सर्व ऑपरेशन्स पंतप्रधान आरोग्य योजना तसेच महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून करण्यात आली.
सुप्रसिद्ध भूलतज्ज्ञ डॉ दीपा गुंडेवार यांनी भूल दिली होती. ऑपरेशन्स यशस्वी करण्यासाठी डॉ सुरेन्द्र काणे,डॉ वर्षा काणे,डॉ फईम गोलीवाले,व्यवस्थापक विश्वास पाटील काणे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथील सर्व स्टाफ यांनी परिश्रम घेतले.