राज्य परिवहन महामंडळातर्फे सोलापूर जिल्ह्यात *प्रवासी राजा दिन* या उपक्रमाचे नियोजन केले असल्याची माहिती अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हा अध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी दिली.
राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांना मिळणाऱ्या सेवा, सुविधांमधील अडचणी,समस्या,तक्रारी व सुचना ऐकून घेऊन जिल्हास्तरावरील अधिकारी व आगार प्रमुखांनी उपस्थित राहून तक्रारींचे निराकरण करावे व सेवेतील त्रुटी तातडीने दूर कराव्यात असे आदेश दिलेले आहेत. त्याप्रमाणे पंढरपूर आगारात बुधवार दि. १७/१२/ २०२५ रोजी प्रवासी राजा या उपक्रमाचे नियोजन केलेले आहे,यावेळी जिल्हास्तरावरील एस टी चे प्रमुख अधिकारी उपस्थित राहून अडचणीचे निराकरण करणार आहेत.
तरी प्रवाशांनी,प्रवासी ग्राहक संघटनांनी बुधवारी दु ११ते १ यावेळेत उपस्थित राहावे असे आवाहन महामंडळाचे आगार प्रमुख योगेश लिंगायत, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे प्रांत सहसचिव दीपक इरकल,जिल्हा उपाध्यक्ष विनय उपाध्ये, सचिव सुहास निकते, पंढरपूर तालुका अध्यक्ष नंदकुमार देशपांडे, उपाध्यक्ष प्रशांत माळवदे,सचिव महेश भोसले, कोषाध्यक्ष सागर शिंदे,कार्यकारिणी सदस्य सतिश निपाणकर,मंगेश देशपांडे यांनी केले आहे.