*जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक वसंतराव पोतदार आलूरकर यांचे तळमळीचे आवाहन*..
सोलापूर दि. 15 डिसेंबर ----
सोलापूर सोनार समाज संस्थेने दि. 28 डिसेंबर रोजी निर्मिती लॉन्स, विजापूर रोड येथे सकाळी 10 वाजता आयोजित केलेल्या कर्तृत्वाचा सन्मान सोहळा आणि शासकीय योजना माहिती शिबिराचे आपण साक्षीदार व्हा.आणि त्याचा प्राधान्याने लाभ घ्यावा असे कळकळीचे आणि तळमळीने आवाहन स्वातंत्र्य चळवळीचे साक्षीदार असलेले जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक वसंतराव आलूरकर यांनी केले आहे. वयाच्या 96 व्या वर्षीही समाजाच्या हिताची चिंता वाहणाऱ्या वसंतराव पोतदार यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, "आपला सुवर्णकार समाज कष्टाळू आणि प्रामाणिक आहे. मात्र केवळ पारंपारिक कौशल्यावर अवलंबून न राहता आधुनिक काळात उपलब्ध असलेल्या संधीचा फायदा करून घेतला पाहिजे. त्यांच्या आवाहनातील इतर मुद्दे असे.
*कारागीरासाठी --- संत नरहरी आर्थिक विकास महामंडळ, पी. एम. विश्वकर्मा योजना किंवा मुद्रा योजना, पंतप्रधान रोजगार निर्मिती, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती अशा अनेक योजना उपलब्ध आहेत. या योजना मधून भांडवल आणि प्रशिक्षण घेऊन कारागीरांनी आपल्या व्यवसायाचे आधुनिकीकरण करावे.
* युवक युवती साठी ---- केवळ नोकरीच्या मागे न लागता शासकीय योजनातून मिळणाऱ्या आर्थिक मदतीने स्वतःचा व्यवसाय सुरु करावा.
* सर्वासाठी --- आरोग्य विमा आणि इतर कल्याणकारी योजनांची माहिती घेऊन सुनिश्चित करावी.
* माहीतच्या अभावी कोणीही वंचित राहू नये. समाजाने संघटित होऊन या योजनेचा लाभ घ्यावा आणि आर्थिक दृष्टीने सक्षम व्हावे असे भावनिक आवाहन त्यांनी केले आहे.