संगीतोपासकांसाठी नवे व्यासपीठ सज्ज....
[पंढरपूर ], दिनांक २५ डिसेंबर:
भारतीय शास्त्रीय संगीत आणि कला क्षेत्रातील योगदानाचा वारसा पुढे नेण्यासाठी व प्रत्येकास सहज संगीत शिक्षण प्राप्त व्हावे यासाठी 'कलापिनी संगीत विद्यालया'चे नूतन जागेत आज मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले. विशेष म्हणजे, या संस्थेला दर्जेदार व्यवस्थापनासाठी ISO मानांकन प्राप्त झाले असून, दर्पण, 12A, 80G आणि NGO यांसारखी महत्त्वपूर्ण प्रमाणपत्रेही विद्यालयास मिळालेली आहेत.
कार्यक्रमाचा वृत्तांत: प्रथम सत्रात विद्यालयातील तब्बल १०० विद्यार्थ्यांनी आपआपले कलेचे सादरीकरण केले यामध्ये तबला,हार्मोनियम,गायन,गिटार व सितार यांचा समावेश आहे. द्वितीय सत्रात उद्घाटन सोहळ्याची सुरुवात दीपप्रज्वलनाने आणि सरस्वती स्तवनाने झाली. यावेळी लंडन मधील सुप्रसिद्ध गायिका अस्मिता दिक्षित, माढा विधानसभा चे लोकप्रिय आमदार अभिजीत पाटील, विठ्ठल मंदिर देवस्थान समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज देशमुख- जळगांवकर, कलापिनी संगीत विद्यालय चे संस्थापक दादासाहेब पाटील, सुप्रसिद्ध युवा तबलावादक अविनाश पाटील, सुप्रसिद्ध संगीत शिक्षक विकास पाटील ,प्रियंका पाटील ,ओंकार पाठक,दादासाहेब नागणे,शिवराज जाधव सह परिसरातील अनेक मान्यवर कलाकार, संगीत प्रेमी आणि हितचिंतक उपस्थित होते. कलापिनी संगीत विद्यालयाने भारतीय शास्त्रीय संगीतातील शिक्षणात आधुनिकपणा यावा व जगासोबत आपले संगीत शिक्षणही अत्याधुनिक असावे यासाठी स्वतंत्र मोबाईल ॲप ची निर्मिती केली त्याचेही लोकार्पण आज करण्यात आले.
कार्यक्रमाच्या तिसऱ्या सत्रात अस्मिता दिक्षित यांचे सुमधुर व सुरेल असे गायन झाले. यास तबलावादनाची साथ अविनाश पाटील, हार्मोनियम ची ओंकार पाठक,पखवाजाची दादासाहेब नागणे यांनी दिली तर सूत्रसंचालन शिवराज जाधव यांनी केले व ध्वनीव्यवस्था दादा जवंजाळ यांनी केले. आभार प्रदर्शन अविनाश पाटील यांनी केले.पंढरपूर व पंचक्रोशीतल सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना संगीत शिक्षणासाठी हि एक पर्वंनी ठरणार आहे.