पंढरपूर प्रतिनिधी --
एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी–पंढरपूर येथे दि. १२ व १३ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन इंटेलिजंट कम्प्युटिंग अँड व्हिजन टेक्नॉलॉजीज अंतर्गत आयोजित चर्चासत्र व गुणवंतांचा पारितोषिक वितरण समारंभ अत्यंत उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडला.
या आंतरराष्ट्रीय परिषद अंतर्गत आयोजित पॅनेल चर्चा अत्यंत अभ्यासपूर्ण व मार्गदर्शक ठरली. या चर्चेमध्ये इंटेलिजंट कम्प्युटिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग आणि कॉम्प्युटर व्हिजन या क्षेत्रांतील भविष्यातील संधी, आव्हाने व दिशादर्शन यावर सखोल विचारमंथन करण्यात आली.
या चर्चासत्रात प्रा. डॉ. के. एम. एस. वाय. कोनारा, युनिव्हर्सिटी ऑफ रुहुणा,श्रीलंका, डॉ. अनिल ए. पिसे - दक्षिण आफ्रिका, डॉ. सुमन लता त्रिपाठी, पुणे, भारत, डॉ. भालचंद्र बी. गोडबोले व डॉ. सुभाष व्ही. पिंगळे, सिंहगड पंढरपूर, भारत या पॅनेल सदस्यांनी उदयोन्मुख तंत्रज्ञान, संशोधनातील नव्या प्रवाहांवर, औद्योगिक गरजा, शैक्षणिक संशोधन व प्रत्यक्ष अनुप्रयोगांतील समन्वय याबाबत मौल्यवान मार्गदर्शन केले. या चर्चेमुळे संशोधक, प्राध्यापक व विद्यार्थ्यांमध्ये अर्थपूर्ण शैक्षणिक संवाद व संशोधनाभिमुख विचारांची देवाणघेवाण घडून आली.
या सत्कार समारंभास मान्यवर, आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ तसेच शैक्षणिक क्षेत्रातील अग्रणी व्यक्तींची उपस्थिती लाभली.
परिषदेच्या निमित्ताने बुद्धिमान संगणन, कृत्रिम बुद्धिमत्ता व व्हिजन टेक्नॉलॉजीज या क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. डॉ. के. एम. एस. वाय. कोनारा, डॉ. अनिल ए. पिसे आणि डॉ. सुमन लता त्रिपाठी यांचा सन्मान करण्यात आला.
संशोधन, नवोपक्रम तसेच जागतिक पातळीवरील समकालीन आव्हानांवर उपाय सुचवणाऱ्या प्रगत तांत्रिक अनुप्रयोगांमधील उत्कृष्ट कार्याची यावेळी विशेष दखल घेण्यात आली. आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये उत्कृष्ठरित्या प्रकल्प सादर केले बददल श्री. येडबा सायबू थोरात, व श्री. सोमशेखर राजशेखर अळंद स्कुल ऑफ कॉम्प्युटेशनल सायन्सेस, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर, श्री. राजेंद्र रमेश पाटोळे, विद्यालंकार इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई, , श्री.अविनाश दशरथ हराळे, व श्री. श्यामसुदंर सदाशिव भिमदे, सिंहगड इन्स्टिटयूट, पंढरपूर या संशोधकांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या संशोधकांचे कौतुक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश जगन्नाथ करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी केले. संपूर्ण दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे उत्कृष्ठ व शिस्तबध्द संयोजन डॉ. अल्ताफ मुलाणी , प्रा. नामदेव सांवत व डॉ. संपत देशमुख यांनी केले.
कार्यक्रमाचा समारोप डॉ. एस. डी. राऊत (पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर) यांच्या आभार प्रदर्शनाने झाला. या परिषदेमुळे सहभागी सर्वांना समृद्ध शैक्षणिक अनुभव व संस्मरणीय क्षण लाभले.
परिषद यशस्वी होणेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश जगन्नाथ करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, डॉ. ए. आर. शिंदे (प्रभारी संचालक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर), परिषदेचे समन्वयक डॉ.आर.एस. मेंते( पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ ,सोलापूर),
संजोयक डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ.नामदेव सावंत, पब्लिकेशन डिन डॉ. संपत देशमुख, सह-संयोजक प्रा. स्वप्निल टाकळे, प्रा.संदीप लिंगे , तसेच सर्व विभाग प्रमुख , सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठ, सोलापूरचे कुलगुरु डॉ. प्रकाश महानवर,उपकुलगुरु डॉ.लक्ष्मीकांत दामा व डॉ. पी. एन. कोळेकर (समन्वयक,पीएम-उषा) यांनी सिंहगड इन्स्टिटयूट, पंढरपूर येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उल्लेखनीय कामगीरीबददल कौतुक केले.