पंढरपूर | प्रतिनिधी
एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी–पंढरपूर येथील यांत्रिकी अभियांत्रिकी विभागाच्या वतीने एआयसीटीईच्या प्रशिक्षण व अध्ययन (अटल) अॅकॅडमी यांच्या सहकार्याने“उद्योग 4.0/5.0 मधील स्मार्ट व शाश्वत उत्पादन प्रणाली : आव्हाने आणि संधी” या विषयावर दि. १५ ते २० डिसेंबर २०२५ या कालावधीत एक आठवडयाचा फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम यशस्वीरीत्या पार पडला.
या फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकूण ६० प्राध्यापकांनी नोंदणी केली असून एआयसीटीई-अटल समितीमार्फत ४२ प्राध्यापकांना अधिकृत मान्यता देण्यात आली. विविध राज्यांतील नामांकित शैक्षणिक संस्थांमधील प्राध्यापकांनी या कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाचे उदघाटन प्रा. एस. ए. जेऊरकर (सीईओ, साज कन्सलटंन्सी, सोलापूर) यांच्या हस्ते झाले. त्यांनी स्मार्ट मॅनुफॅक्चरींग तसेच इंडस्ट्री 4.0/5.0 या संकल्पनांवर सखोल मार्गदर्शन केले. यानंतर इंजिनियर अतुल प्रभुणे (जनरल मॅनेजर, बरखत काँम्प्रेशन, पुणे) यांनी थ्रीडी प्रिंटींग व रॅपीड प्रोटोटायपींग या विषयावर तांत्रिक व्याख्यान दिले. यासोबतच थ्रीडी प्रिंटींगचे प्रत्यक्ष हँड्स-ऑन प्रशिक्षणही देण्यात आले.
दुसऱ्या दिवशी शाश्वत उत्पादन व औद्योगिक केस स्टडी या विषयांवर डॉ. एस.एस.कुलकर्णी यांनी उद्योग ४.०च्या पार्श्वभूमीवर उत्पादन प्रक्रियेत शाश्वत विकास या विषयावर मार्गदर्शन केले. त्यानंतर इंजिनियर हरी दुधनकर (जनरल मॅनेजर, शेल्फर कंपनी, पुणे) यांनी इंडस्ट्री ४.० मधील आव्हाने व संधी यांवर आधारित औद्योगिक केस स्टडीज सादर केल्या.
तिसऱ्या दिवशी एआय, एमएल व पीएलएम या विषयांवर सत्रांचे आयोजन करण्यात आले. डॉ. एस. एस. परदेशी (सहयोगी प्राध्यापक, सीओईपी, पुणे) यांनी ॲडिटीव्ह मॅन्युफॅक्चरिंगमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता व यंत्रअभ्यास यांच्या उपयोगांवर व्याख्यान देण्यात आले. त्यानंतर अभियंता विनंद आरबळे (संस्थापक व संचालक, इन्व्हेंटेक्नो, पुणे) यांनी उत्पादन जीवनचक्र व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी मिश्रित साहित्य प्रयोगशाळेचे प्रात्यक्षिक सत्र देखील आयोजित करण्यात आले.
इंडस्ट्री ५.० व सॉफ्टवेअर ट्रेनिंग या विषयांवर चौथ्या दिवशी सत्रे पार पडली. डॉ. ज्योती मेघानी (सहयोगी प्राध्यापक, एसव्हीएनआयटी, सूरत) यांनी लेसर क्लॅडिंगद्वारे विकसित उच्च एंट्रॉपी मिश्रधातू आवरणावरील मधील अलीकडील संशोधनावर व्याख्यान दिले. त्यानंतर डॉ. एम. एस. देशपांडे (संस्थापक व प्रमुख प्रशिक्षक, ए. सी. ई. सॉफ्ट स्किल सोल्युशन्स) यांनी उद्योग क्षेत्राच्या पाचव्या टप्प्यासाठी आत्मनेतृत्व व पर्यावरणपूरक वर्तन या विषयांवर मार्गदर्शन केले. मॅटलॅब सॉफ्टवेअरद्वारे बिग डेटा व मॅन्युफॅक्चरिंगवरील हँड्स-ऑन प्रशिक्षणही देण्यात आले.
पाचव्या दिवशी डिजीटल ट्रान्सफॉरमेशन व एनईपी- 2020 या विषयांवर व्याख्याने झाली. डॉ. विजय गडाख (सहयोगी प्राध्यापक, एसीओई, संगमनेर) यांनी डिजीटल ट्रान्सफॉरमेशन इन मॅनुफॅक्चरींग या विषयावर मार्गदर्शन केले. त्यानंतर डॉ. मंदार भानुशाली (प्रोफेसर व विभागप्रमुख, युनिर्व्हसिटी ऑफ मुंबई ) यांनी नवीन शैक्षणिक धोरण – एनईपी- 2020 याविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच Minitab सॉफ्टवेअरवर आधारित संशोधन सत्रही घेण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान इंडस्ट्री ४.० व एआय आधारित उत्पादन प्रक्रियांवरील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संशोधन लेखांवर चर्चा सत्रांचे आयोजन करण्यात आले. फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या अंतिम दिवशी सहभागी प्राध्यापकांसाठी प्रिसीजन कास्टींग, एम.आय.डी.सी. , चिंचोली, सोलापूर येथे औद्योगिक भेटीचे आयोजन करण्यात आले. या भेटीत फाउंड्री, मशीन शॉप प्रक्रिया, उत्पादन प्रणाली व गुणवत्ता नियंत्रण यांची प्रत्यक्ष माहिती देण्यात आली.
या फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचे आयोजन समन्वयक डॉ. बाळासाहेब एस. गंधारे, उपप्राचार्य समन्वयक डॉ. स्वानंद जी. कुलकर्णी तसेच यांत्रिकी अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. एस. एस. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश जगन्नाथ करांडे यांचे विशेष पाठबळ या कार्यक्रमाला लाभले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी यांत्रिकी अभियांत्रिकी विभागातील सर्व अध्यापकवर्ग, तांत्रिक व अध्यापनेतर कर्मचारी तसेच आयोजन समिती सदस्यांचे मोलाचे योगदान लाभले.
समारोप सत्रानंतर हा फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम यशस्वीरीत्या पूर्ण झाला. सहभागी प्राध्यापकांनी हा कार्यक्रम उच्च दर्जाचा, उद्योगसुसंगत व संशोधनाभिमुख असल्याची भावना व्यक्त केली.