पंढरपूर प्रतिनिधी :
न्यु सातारा समुह मुंबई संचलित, न्यु सातारा कॉलेज ऑफ बी.सी.ए. कोर्टी-पंढरपूर मध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करीता “राष्ट्रीय सेवा योजना” एककाचे उदघाटन संस्था प्रतिनिधी श्री.शेडगे डी.डी. यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.तंटक एन.एन.हे होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून राष्ट्रीय सेवा योजना फलकाला हार घालून व फीत कापून उत्घाटन करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजना बाबतची सविस्तर माहिती दिली. आपण N.S.S. चे कार्य करत असताना आपण समाजाचे देणे लागतो व या कार्यामधून आपण स्वच्छता, दान उत्सव ,अशा विविध संकल्पनेतून आपण सेवा दिली पाहिजे , असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
यानंतर महाविद्यालयाचे उप-प्राचार्य प्रा.प्रवीण ताठे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचा इतिहास व राष्ट्रीय सेवा योजने संबंधी संपुर्ण माहिती विद्यार्थ्यांना दिली. यामध्ये राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे समाजासाठी केला जाणारा निःस्वार्थ त्याग असुन तो प्रत्येक विद्यार्थ्याने अंगीकृत करणे आवश्यक आहे असे प्रतीपादन त्यांनी केले.युवक व युवतींना या योजनेचा फायदा असुन त्याचे महत्व सागितले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून रक्तदान शिबीर,आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा ,महिला सशक्तीकरण,जलसंधारण व व्यवस्थापन ,वृक्ष लागवड व संवर्धन,स्वच्छ सुंदर गाव,इत्यादी विविध उपक्रम राबविता येत असल्याचे सागितले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.तंटक एन.एन. यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्याचा कसा सर्वागीण विकास होते व तो एक जबाबदार नागरिक म्हणुन नावारूपास येतो हे सागितले.प्रत्येक विद्यार्थ्याने स्वयंस्फुर्तीने व उत्साहाने यात सहभाग घेतला पाहिजे असे मत त्यांनी यावेळी मांडले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बीसीए विभागप्रमुख प्रा.कुलकर्णी बी.पी. यांनी केले. व सूत्रसंचालन बीसीए प्रथम वर्षातील विद्यार्थिनी कु.स्वप्नाली दादा बिडवे व बीसीए तृतीय वर्षातील विद्यार्थिनी कु.साक्षी संतोष गळवे यांनी केले.याप्रसंगी प्राचार्य डॉ.तंटक एन .एन ,उप-प्राचार्य प्रा.ताठे पी.बी, विभागप्रमुख प्रा. कुलकर्णी बी.पी, विद्यार्थी समन्वयक प्रा.गोडसे यु.आर, प्रा.पाटोळे व्ही.एस,प्रा. मुजावर एस.एस.,प्रा.पाटील,श्री.शिंदे एस.एम,सौ.साबळे आर.एन.व रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा.काळे एस.एस.,तसेच महाविद्यालयातील रा.से.यो. चे स्वयंसेवक / स्वयंसेविका, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा.काळे एस.एस. यांनी मानले. सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री .राजाराम (नाना) निकम साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.