पंढरपूर प्रतिनिधी --
पंढरपूर येथील "जनसेवा हीच ईश्वर सेवा" या सद्भावना सेवाभावाने निस्वार्थ या भावनेने सेवा करणारे राजश्री गायकवाड या समाजसेवेच्या प्रेरणेने वयोवृद्ध महिला व पुरुषांना मसाज थेरेपीच्या माध्यमातून सेवा देण्याचे काम सातत्याने करीत आहेत.
पंढरपूर पासून जवळच असणाऱ्या गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रममध्ये वृद्ध महिला व पुरुषांचे विविध आजारांवर रामबाण उपाय म्हणून ते मसाज थेरेपी माध्यमातून सेवा देण्याचे काम करतात तसेच ते टेंभुर्णी येथील गोविंद वर्धाश्रम तसेच कराड येथील संजीवन वृद्धाश्रम व लांबोटी येथील प्रार्थना वृद्धाश्रम यासारख्या ठिकाणी स्वखर्चाने जाऊन वृद्ध महिलांना व पुरुषांना मसाज थेरेपीच्या माध्यमातून त्यांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी योग्य मार्गदर्शन हि करतात .
या त्यांच्या कार्याची ओळख समाजापुढे आदर्शवत असुन
त्यांना मसाज थेरपी समाजसेवेतून मिळणारे समाधान हे समाजापुढे वेगळा आदर्श ठेवल्याचे सर्व स्तरातून बोलले जात आहे.भविष्यात महाराष्ट्रातील कोणत्याही कानाकोपऱ्यात अशा आश्रमांच्या माध्यमातून जर वृद्ध महिला पुरुषांची सेवा करण्याची संधी मिळाली तर त्या संधीचही मी सोन करेन असेही त्यांनी यावेळी आवार्जुन सांगितले.
*चौकट*
निराधार स्री पुरुषांच्या रक्तातील नात्यांचा विसर पडलेल्यांने नाती दुरावल्याचे अशीच व्यक्ती वृद्धाश्रमात आश्रय घेऊन जिवन व्यथित करतात त्यांनाचे आरोग्य चांगले राहावे त्यांना विविध व्याधि असतात त्यांच्या दुःखावर मायेची फुंकर घालून आपलपणाचे नातं निर्माण करण्याचे कार्य करताना जण सेवा ही ईश्वर सेवा केल्याचा आत्मिक आनंद मिळतो.
राजश्री गायकवाड
पंढरपूर