पंढरपूर तिरुपती पंढरपूर आजपासून नवी रेल्वे सुरू.. विठ्ठलाच्या दर्शनानंतर आता थेट तिरुपतीला बालाजीच्या दर्शनासाठी

पंढरपूर प्रतिनिधी --
अनेक वर्षांपासूनची मागणी आज पूर्ण झाली असल्याचे समाधान रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्यांनी व्यक्त केली  आहे. विठ्ठल दर्शनानंतर लगेच बालाजी दर्शन असा योग या नवीन पंढरपूर तिरुपती पंढरपूर रेल्वेच्या माध्यमातून नागरिकांना, भाविक भक्तांना मिळणार आहे.

 पंढरपूरहून लातूरमार्गे तिरुपतीला जाण्यासाठी साप्ताहिक रेल्वे आज शनिवार (ता.१३) पासून सुरू होत आहे. विठ्ठलाच्या दर्शनानंतर आता थेट तिरुपतीला बालाजीच्या दर्शनासाठी भाविकांना जाता येणार आहे. पंढरपूर-तिरुपती साप्ताहिक रेल्वे सेवा लातूर मार्गे सुरू करण्याला नुकतीच मंजुरी दिली आहे.दक्षिण मध्य रेल्वे विभागाने गाडी क्रमांक ०७०१२ आणि ०७०१३ क्रमांकाची  रेल्वेसेवा लातूरमार्गावरून पंढरपूर-तिरुपती सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. प्रवाशांच्या मिळणाऱ्या प्रतिसादावर या गाडीची पुढील रूपरेषा निश्चित केली जाणार आहे. ही सुविधा तूर्तास १३ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२५ या कालावधीत सुरू असणार आहे. 

आहे. गाडी क्रमांक ०७०१२ ही १३ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजून ४० मिनिटांनी तिरुपती येथून सुटेल. ती गाडी काचीगुडा, सिकंदराबाद, बिदर, लातूर, बार्शी कुर्दुवाडी मार्गे दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी (ता. १४) सायंकाळी ६ वाजून ५० मिनिटांनी पंढरपूर स्थानकावर पोचेल तर गाडी क्रमांक ०७०१३ दर रविवारी पंढरपूरहून रात्री आठ वाजता निघेल. ही गाडी मध्यरात्री १२.१० वा. लातूर रेल्वे स्थानकावर पोचेल. दुसऱ्या दिवशी सोमवारी रात्री साडेदहा वाजता तिरुपती स्थानकावर पोचेल. या गाडीला एक वातानुकूलित प्रथमवर्ग, एक वातानुकूलित फर्स्ट कम-टू-टीअर, दोन वातानुकूलित -टू-टीअर, ६ वातानुकूलित श्री टीअर, ९ शयनयान, दोन द्वितीय श्रेणी कम दिव्यांग एसएलआर असे एकूण २३ डबे असणार आहेत.अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form