सोलापूर प्रतिनिधी --
दिनांक 28 डिसेंबर रोजी सोलापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य सोनार समाज गौरव सोहळा व शासकीय योजना माहिती शिबीरासाठी समाजातील युवा उद्योजक, कारागीर, सराफ व्यावसायिक बांधवानी मोठया संख्येने उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन मोडनिंब येथील युवा उद्योजक इंजिनिअर गोरक्ष वेदपाठक, माढा येथील युवा उद्योजक इंजिनिअर प्रथमेश वेदपाठक, वागदरी येथील युवा उद्योजक अभिषेक पोतदार या युवा सराफ व्यवसायिकानी संयुक्तपणे हे आवाहन केले आहे. या वेळी बोलताना या उद्योजकांनी सांगितले की, " आपला पारंपारिक सराफ व्यवसाय अत्यंत प्रतिष्ठित आहे. परंतू सध्याच्या स्पर्धेच्या युगात शासकीय योजनांचे पाठबळ घेणे आवश्यक आहे. नरहरी आर्थिक विकास महामंडळ, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना, पी. एम. विश्वकर्मा योजना, मुद्रा योजना यासारख्या योजना मुळे व्यवसायाचे आधुनिकीकरण करणे आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम होणे शक्य आहे . आम्ही उच्च शिक्षित असूनही नोकरीच्या मागे न लागता पारंपारिक प्रतिष्ठित सराफ व्यवसाय स्वीकारला. आम्ही स्वतः या क्षेत्रातील आव्हाने अनुभवली आहेत. सोनार समाज संस्था सोलापूर ने आयोजित केलेले हे शिबीर समाजासाठी एक सुवर्णा संधी आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. तरी जिल्ह्यातील सर्व सोनार युवक, युवती, व्यवसायिकानी या शिबिराचा लाभ घेऊन आपला व्यवसाय वाढवावा असे आग्रही आवाहन त्यांनी केले आहे.