सोलापूर प्रतिनिधी --
राज्यातील, जिल्ह्यातील सोनार समाजासाठी प्रथमच शासकीय योजना माहिती शिबिराचे आयोजन सोलापूर शहरात करण्यात आले आहे.सोनार समाज संस्था, सोलापूर यांच्या वतीने दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता निर्मिती लॉन्स, विजापूर रोड सोलापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या या अभिनव शिबीर म्हणजे समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी उचललेले हे पहिले पाऊल अत्यंत कौतुकास्पद आहे.
समाजातील अनेक कारागीर आणि कुटुंबे माहितीच्या अभावी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना पासून वंचित राहतात.ही उणीव भरून काढण्यासाठी सोलापूर सोनार संस्थेने पुढाकार घेतला. शिबिरामध्ये संत नरहरी आर्थिक विकास महामंडळाच्या विविध योजना,महाराष्ट्र उद्योजकता प्रशिक्षण कार्यकन,पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना,पी एम विश्वकर्मा योजना आदी योजनेवर तज्ञांनी मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिराला सोलापूर जिल्ह्यासह आसपास च्या भागातून समाज बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा.
सोलापूर येथे प्रथमच अशा प्रकारच्या माहिती शिबिराचे आयोजन करून,समाज हिताचा दृष्टिकोन ठेवल्याबद्दल संस्थेचे कार्य सर्व स्तरातून कौतुकास्पद ठरत आहे.केवळ मनिरंजनाचा कार्यक्रम न घेता समाजाच्या आर्थिक व शैक्षणिक दृष्टया सक्षम करणाऱ्या उपक्रमावर भर दिल्याने समाजातील सर्व स्तरातून कौतुक आणि अभिनंदन होत आहे.
संस्थेने समाजाच्या तात्कालिक गरजा ओळखून या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. ही दूरदृष्टी आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी अभिनंदनास पात्र आहे. थोडक्यात सांगायचे म्हणजे संस्थेने निष्क्रिय न राहता समाजाच्या हितासाठी उपयुक्त, व्यावहारिक आणि दिशा दर्शक कार्य केले आहे, करत आहे. म्हणून संस्थेचे कार्य कौतुकास्पद आहे. तरी सर्व गरजू समाज बांधवानी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा ही विनंती.
संपादक
विनोद पोतदार
आपला मराठी बाणा,
पोर्टल व युट्यूब नेटवर्क