🥉🥉🥉🥉🥉🥉🥉🥉🥉
*प्रदीप भडगांवकर यांच्या आठवणींच्या गंधकोषी पुस्तकाचे प्रकाशन*
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
पंढरपूर प्रतिनिधी--
श्री क्षेत्र पंढरपूर येथे अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताची परंपरा मोठी आहे.आणि त्यामध्ये रसिकमंडळाने सुरुवात केली.त्यांची ही परंपरा पंढरपूर येथील स्वरसाधना या संस्थेने अखंड ३५ वर्ष करत अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताचे संस्कार सर्व पंढरपूर कलारसिक श्रोत्यांना दिले. याच माध्यमातून स्वरसाधनाचे सदस्य श्री प्रदीप राव भडगांवकर यांनी शास्त्रीय संगीताच्या मैफिलीच्या वेळी आलेल्या सर्व कलाकारांच्या आठवणी आठवणींच्या गंधकोशी या पुस्तकातून शब्द रूपाने लिखित केल्या आहेत. त्या पुस्तकाचे प्रकाशन पंढरपूर तालुक्याचे भाग्यविधाते माजी आमदार श्री प्रशांत मालक परिचारक गायक श्री दिलीप टोमके प्रदीपराव भडगावकर बंधू विलास भडगांवकर,अरुण भडगांवकर,सीमा भडगांवकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी प्रदीपराव भडगांवकर आणि सीमा भडगांवकर यांचा सत्कार प्रशांत मालकांच्या शुभहस्ते करण्यात आला.
प्रास्ताविकामध्ये प्रदीपराव भडगांवकर यांनी सांगितले की संगीत सेवा हीच खरी सेवा आणि यामुळे अनेक दिग्गज कलाकारांची सेवा करण्याचे भाग्य मला मिळाले आणि त्या आठवणी कायम रसिकांच्या मनात उर्जा देत रहाव्या याच भुमिकेतून हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मिळाली.त्यानंतर प्रशांतमालक परिचारक यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की भारतीय अभिजात शास्त्रीय संगीत हा प्रत्येक गाण्यांचा मूळ पाया आहे.आणि साहित्य कला यावरून शहराची खरी श्रीमंती कळते त्यामुळे परंपरागत विठुरायाच्या आशीर्वादाने आणि स्वरसाधनेच्या पुढाकारातून अनेक दिग्गज कलाकारांनी पंढरपूरला येऊन आपली कला सादर केली. आणि तेच संस्कार आपल्या या पंढरी नगरीमध्ये रुजलेले आहेत.ही खुप मोठी गोष्ट आहे.आणि परंपरा कायम रहावी यासाठी पुढील काळात ही माऊली दूधाणे आणि मनमाडकर परिवार यांनी हे शिवधनुष्य उचललेल आहे. त्यांना माझा सदैव पाठिंबा असेल त्यांनी ही परंपरा जपावी असे सांगत पडद्यामागील कलाकारांचे अनुभव हे अतिशय प्रेरणादायी असतात आणि ते अनुभव प्रदीपराव यांनी आपल्या लेखनातून पुस्तकरूपाने प्रसिद्ध केले आहे.शुभेच्छा देत अभिनंदन केले.
यावेळी ३५ वर्षांच्या आठवणींचा ठेवा उलगडला.याआधी श्री ज्ञानेश्वर दुधाने मिलिंद परिचारक दिलीपराव टोमके यांनी आपली मनोगत व्यक्त करतो आठवणींचा गंधकोश हा आठवणींचा ठेवा पंढरपूर कला रसिक श्रोत्यांसाठी एक ऊर्जादायी आणि प्रेरणादायी ठरेल असे सांगत शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सुंदर सुत्रसंचलन तुकाराम चिंचणीकर यांनी केले.यावेळी भडगांवकर परिवारावर प्रेम करणारे सर्व रसिक श्रोती मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अनेकांनी प्रदीप राव भडगांवकर यांचा सत्कार करत त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रवीण ताठे,प्रतिक भडगांवकर, सानिका भडगांवकर, अजीत माने यांनी अधिक परिश्रम घेत कार्यक्रम यशस्वी केला.