लोकशाहीचा उत्सव असणाऱ्या पवित्र मतदान प्रक्रियेत स्वराज्य पोलीसमित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे पंढरपूरमध्ये उल्लेखनीय सेवाकार्य


 पंढरपूर प्रतिनिधी-- 
लोकशाहीच्या पवित्र उत्सवात आज  पंढरपूर मधील विविध मतदान केंद्रांवर स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना पंढरपूर यांनी केलेली सेवा विशेष कौतुकास्पद ठरली. मतदान सुरळीत आणि शांततेत व्हावे, यासाठी *संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री दीपक कांबळे व संस्थापक तथा मुख्य महासचिव श्री कमलेशजी शेवाळे ,तसेच विश्वस्त तथा महाराष्ट्र अध्यक्ष सौ धनश्रीताई उत्पात, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री रामभाऊ बडवे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री कैलास कारंडे,  सोलापूर जिल्हाध्यक्ष श्री चंद्रकांतदादा वेदपाठक यांच्या मार्गदर्शनातून पंढरपूर तालुकाध्यक्ष श्री प्रविण सुरवसे तालुका महिला संघटक सौ सुवर्णा कुरणावळ, श्री गंगाधर स्वामी हे संघटनेचे कार्यकर्ते अगदी दिवसभर मतदारांना सहकार्य करताना दिसले*.
        आज सकाळपासूनच मतदान केंद्रांवर वाढलेली गर्दी व्यवस्थित हाताळण्यासाठी स्वयंसेवकांनी रांगेत उभे असलेल्या मतदारांना मार्गदर्शन केले, शिस्त राखण्यासाठी मदत केली तसेच मतदानाची माहिती नसलेल्या नागरिकांना बूथ क्रमांक, लोकेशन, मतदान प्रक्रिया,  नियम इत्यादी महत्वाच्या गोष्टींचे मार्गदर्शन केले.

         विशेषतः ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत सुरक्षितपणे पोहोचवण्याची जबाबदारी संघटनेच्या सदस्यांनी अत्यंत संवेदनशीलतेने पार पाडली. व्हीलचेअर, काठी किंवा आधार घेऊन आलेल्या मतदारांना स्वयंसेवकांनी हात देत केंद्रापर्यंत नेले व आवश्यक ती मदत केली.

        मतदारांच्या सोयीसाठी स्लिप क्रमांक तपासणे, त्यानुसार संबंधित बूथपर्यंत नेणे, तसेच गोंधळ होऊ नये म्हणून प्रत्येकाला योग्य मार्गदर्शन करणे अशी कामे संघटनेच्या सदस्यांनी उत्साहाने पार पाडली. अनेक ठिकाणी मतदानाची प्रक्रिया जलद करण्यासाठीही त्यांच्या सहकार्याचा फायदा झाला.

      *संघटनेचे पंढरपूर तालुका अध्यक्ष श्री प्रविण सुरवसे म्हणाले की,“लोकशाही मजबूत करण्यासाठी नागरिकांनी निर्धास्तपणे मतदान करणे आवश्यक आहे. यात आमचे योगदान समाजसेवेसाठी कर्तव्य आहे.”*

         मतदार तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी संघटनेच्या कार्याचे कौतुक करत समाधान व्यक्त केले. दिवसभर शांततेत, सुरक्षित वातावरणात आणि सहकार्याच्या भावनेत पार पडलेली मतदान प्रक्रिया ही स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना पंढरपूर तालुका यांच्या सहभागामुळे अधिक परिणामकारक ठरल्याचे पंढरपूर मध्ये सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form