सोलापूर प्रतिनिधी --
प.पू. श्री श्री श्री सद्गुरु नारायण महाराज (आण्णा) यांच्या कृपाआशिर्वादाने व श्री टेंबे स्वामी महाराज यांच्या अधिपत्याखाली तीन दिवसांचा भव्य दिव्य दत्त जयंती सोहळ्याचे आयोजन श्री दत्त देवस्थान सेवाभावी ट्रस्ट, श्री क्षेत्र नारायणपूर येथे करण्यात आले आहे.
दत्त जयंती सोहळ्याच्यी रुपरेषा पुढीलप्रमाणे असुन प्रथम दिवस (यज्ञकुंड वर्धापन दिन)मंगळवार दिनांक २/१२/२०२५ रोजी, दुपारी १२.०५ वा.आजोळ हिवरे ज्योत स्वागत,सायंकाळी ४ ते ६ २०० कोटी शिव-दत्त नाम यज्ञ,अखंड प्रज्वलित अग्नी यज्ञकुंड २५वा वर्धापन दिन रात्री ८.३० वा. श्री दत्त मंदीरात आरती होईल.तसेच द्वितीय दिवस बुधवार दिनांक ३/१२/२०२५ रोजी दुपारी २ वाजल्या पासुन येणाऱ्या सर्व दिंड्यांचे भव्य स्वागत.
सायंकाळी ७.०३ वाजता श्री दत्तजन्म सोहळा. सुंठवडा व महाप्रसाद व तृतीय दिवस (श्री दत्त जयंती सोहळा) गुरुवार दिनांक ४/१२/२०२५ रोजी पहाटे ४ ते ६ रुद्रअभिषेक सकाळी ९ वा. श्री दत्तमहाराजांची पालखीतून ग्राम प्रदक्षिणा होईल दुपारी १.३० वा. प्रवचन, आरती व महाप्रसाद असा तिन दिवसाचा दत्त जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे गुरु बंधु शाम पोतदार व सोलापूर येथील साधकांनी माहिती दिली आहे.तसेच सर्वांनी सदय दत्त जयंती सोहळ्यामध्ये सहभागी होऊन पारमार्थिक आनंद घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.