28डिसेंबर रोजी सोलापूर येथे आयोजन,कर्तृत्वान व्यक्तींचा सन्मान व शासकीय योजनांची माहिती

*सोनार समाजाचा गौरव सोहळा व माहिती शिबीर* 
सोलापूर प्रतिनिधी --
सोनार समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्वान व्यक्तींच्या गौरवार्थ आगामी रविवार दि. 28 डिसेंबर रोजी राज्यस्तरीय एका भव्य पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमा सोबतच समाजातील बांधवासाठी विविध शासकीय योजना विषयी माहिती देणाऱ्या एका मार्गदर्शन शिबिराचेही आयोजन करणेत आले असून सोलापूर जिल्ह्यातील तसेच लगतच्या जिल्यातील सोनार समाज बांधवानी मोठया संख्येने उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
*कार्यक्रमाचा तपशील* 
स्थळ :-- निर्मिती लॉन्स, विजयपूर रोड, सैफुल चौक जवळ, सोलापूर 
दिनांक :--रविवार दि. 28 डिसेम्बर 2025.
वेळ : -- सकाळी 10 : 00 वाजता.
समाजाचे नाव उंचावणाऱ्या खालील मान्यवरांना विविध सामाजिक बांधिलकी पुरस्कार प्रदान करून सन्मानीत करून गौरविण्यात येणार आहे.
*समाज भूषण पुरस्काराचे मानकरी* 
सर्वश्री अतुल वसंतराव पोतदार साहेब, अधीक्षक कस्टम्स दापोडी, प्रकाश महादेव पोतदार सांगली, विलास ज्ञानेश्वर वेदपाठक तुळजापूर, उदयकुमार सुधाकर माणकापुरे डेप्युटी इंजिनिअर कोल्हापूर, सतीश रामभाऊ महामुनी व शिवाजी राघोबा महामुनी बीड, प्रा. डॉ. प्रमोद भालचंद्र पाचणकर साहेब पुणे, डॉ. विनोद लिंबनाथ वेदपाठक साहेब अंबाजोगाई, अक्षय शामराव महामुनी सांगोला, हेमंतकुमार आंबादास महामुनी पंढरपूर, वासुदेव हरिश्चंद्र वेदपाठक धाराशिव, महेश मुरलीधर अनाळकर सोलापूर ( पुणे ), मधुकर मनोहर महाले, छ. संभाजीनगर, विवेकानंद शंकरराव जडे लातूर, सुनील माणिकराव वेदपाठक कोल्हापूर / कळंब धाराशिव, उद्योजक भगवानराव किसनराव पंडित भोसरी पुणे, संजय गंगाराम क्षीरसागर गोंदवले बु ii,  सुरेश दिगंबर सोनार जेऊर ( काशिलिंग ), फार्मा. सतीश प्रकाश पोतदार सोलापूर, सुधीर विजयकुमार पंडित सर करमाळा, महेश सूर्यकांत दीक्षित विटा,श्रीमती विजया आंबादास महामुनी जेऊर (करमाळा ), रामचंद्र यमुनप्पा दीक्षित, सूर्यकांत शंकरराव पंडित झरेगावकर, सौं छाया व श्री उमेश विश्वनाथ वेदपाठक मुरूमकर, सौं. सुधा व श्री विनायक एकनाथ मंगरूळकर,सोलापूर, प्रा.श्रीमती संजीवनी विठ्ठलराव पानगे लोणी प्रवरानगर, संतोष नंदकुमार तुळजापूरकर, इंटरनॅशनल अवॉर्ड प्राप्त महेंद्रकुमार विजयकुमार दीक्षित, प्रकाश नीलकंठ कटारे रत्नपारखी, साखर कारखानदार प्रवीण विरणा पत्तार, सौं शुभांगी व श्री हेमंत प्रभाकर महामुनी सोलापूर, श्रीमती सविता रामचंद्र दादजवार हदगांव नांदेड, डॉ. अतुल ज्ञानेश्वर क्षीरसागर उपळाई बु ii माढा, सौं सविता यशवंत बारसकर उदगीर , सौं. सुनीता कमलाकर पंडित निलंगा, सुनील देविदासराव महामुनी, सुनील लक्ष्मणराव वेदपाठक, तुळजापूर.
*उद्योगरत्न*--
उमेश शिवराज वेदपाठक तुळजापूर, राहुल सुभाष तपासे वैराग, संतोष भारत दीक्षित मुरुड. *आदर्श शिक्षक रत्न* -
श्री. प्रसाद भारत धर्माधिकारी तुळजापूर,
*अभियांत्रिकी उत्कृष्ठता पुरस्कार* -- 
इंजि. अभिषेक राजकुमार सोनार जेऊर ( काशिलिंग )
, *हिरकणी पुरस्कार* - 
इंजि.कुमारी श्रेया किशोर कुरुलकर, इंजि. सौं. अमृता प्रथमेश वेदपाठक. 
*आदर्श माता पिता पुरस्कार* 
सौं. रेखा व श्री. मधुकरराव भगवानराव कुमठेकर सोलापूर. *प्रेरणा व्यक्तिमत्व पुरस्कार* -- श्री प्रीतम विजयकुमार भास्करे.*युवा उद्योग सुवर्ण रत्नपुरस्कार* - गोरक्ष सुभाष वेदपाठक मोडनिंब, प्रथमेश प्रमोद वेदपाठक माढा, प्रज्ञेश सुरेश पंडित कोल्हापूर / बार्शी, प्रथमेश अविनाश पंडित कोल्हापूर / धाराशिव, अभिषेक चंद्रकांत पोतदार वागदरी ( अकलकोट ), श्रीनिवास दिलीप पोतदार आरग - सांगली, ऋषिकेश निलेश धाराशिवकर, हरिओम व श्रीहरी दीपक कुरुलकर सोलापूर,
*युवा रत्न पुरस्कार*
 प्रसाद अजितकुमार भास्करे माढा. 
*शासकीय योजना माहिती शिबीर* -- 
पुरस्कार वितरण सोहोळ्यानंतर लागलीच समाजातील कारागीर आणि गरजू कुटुंबियांसाठी महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकारच्या अनुक्रमे संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळाच्या विविध योजना,उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम,पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना ( PMEGP), मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना ( CMEGP )  पी. एम. विश्वकर्मा योजना इत्यादी बाबत तज्ञाकडून मार्गदर्शन केले जाईल.कार्यक्रमानंतर उपस्थित सर्व समाज बांधवासाठी भोजनाची सोय करण्यात आली आहे. याची कृपया नोंद घ्यावी.कार्यक्रमाचे संयोजन सोनार समाज संस्था सोलापूर यांनी केले आहे. समाजातील जास्तीतजास्त बांधवानी या दुहेरी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेने केले आहे.आयोजक संस्थेच्या सर्व पुरस्कार प्राप्त मानकऱ्यांचे त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या यशामुळे संपूर्ण समाजाची प्रतिष्ठा वाढली असून त्यांचे कार्य इतरांना प्रेरणादायी ठरेल अशी सदिच्छा कार्यक्रमाचे आयोजक सोलापूर सोनार समाज संस्थेचे अग्रणी प्रवर्तक सर्वश्री मोहनराव मंद्रूपकर, संजयजी मैंदर्गीकर व संतोषशेठ कळमणकर अध्यक्ष वसंत पोतदार, उपाध्यक्ष विजयकुमार पोतदार, सचिव दत्तगुरु वेदपाठक, सहसचिव गिरीश जमखंडीकर, खजिनदार गजानन सोनार, इंजि. विजयकुमार पोतदार, इंजि. रुद्रप्पा दोडमनी, प्रा. डॉ. अमर दीक्षित, सौं चित्रा पोतदार या सर्वांकडून व्यक्त करण्यात आली आहे. संपर्क क्र. 94230 65915, 90499 96946, 80874 21025.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form