एस.के. एन. सिंहगड महाविद्यालय, कोर्टी, पंढरपूरच्या “Ghost Riders” संघाने नॅशनल गो-कार्ट चॅम्पियनशिपमध्ये मिळवले घवघवीत यश

पंढरपूर, ऑक्टोबर २०२५ - 
एसकेएन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर येथील यांत्रिकी अभियांत्रिकी विभागातील “Ghost Riders” संघाने तामिळनाडू येथील कुमारगुरू महाविद्यालयामध्ये FMAE (Fraternity of Mechanical and Automotive Engineers) तर्फे आयोजित नॅशनल लेव्हल गो-कार्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले. ही स्पर्धा ७ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर २०२५ दरम्यान पार पडली.

या स्पर्धेत देशभरातील ३० संघांनी सहभाग घेतला, त्यामध्ये सिंहगड पंढरपूरच्या “Ghost Riders” संघाने आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर ऑल इंडिया रँक ७ मिळवली. तसेच संघाने Skid Pad Round मध्ये उपविजेतेपद (Runner-Up) पटकावून महाविद्यालयाचा आणि विभागाचा मान उंचावला.
या संघामध्ये २५ यांत्रिकी अभियांत्रिकी विद्यार्थी सहभागी होते, ज्यांचे नेतृत्व तेजस पवार यांनी केले. विद्यार्थ्यांनी वाहनाचे डिझाईन, फॅब्रिकेशन, डायनॅमिक टेस्टिंग आणि रेस परफॉर्मन्स या सर्व टप्प्यांवर परिश्रम घेऊन उत्कृष्ट टीमवर्क आणि अभियांत्रिकी कौशल्याचे प्रदर्शन केले.

या उल्लेखनीय यशामागे डॉ. ए. एस. अराध्ये यांचे तांत्रिक मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण पाठबळ लाभले. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रकल्पाच्या प्रत्येक टप्प्यावर दिशा व प्रोत्साहन दिले.स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांनी विविध यांत्रिक समस्या सोडविण्याचे कौशल्य, नवकल्पक डिझाईन विचारसरणी आणि जलद निर्णयक्षमता प्रदर्शित केली. त्यांच्या या उत्साही सहभागामुळे महाविद्यालयातील संशोधन संस्कृती आणि प्रायोगिक शिक्षणाला नवचैतन्य लाभले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, विभागप्रमुख डॉ. एस. एस. कुलकर्णी, तसेच सर्व शिक्षकवर्ग आणि शिक्षकेतर कर्मचा-यांने “Ghost Riders” संघाचे मनःपूर्वक अभिनंदन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी सांगितले की, “हे यश आमच्या विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्य, शिस्त आणि नवनिर्मितीक्षमतेचे प्रतीक आहे.”सिंहगड  पंढरपूरचा “Ghost Riders” संघ हा विद्यार्थ्यांच्या नवोन्मेषी विचारसरणी, आत्मविश्वास आणि तांत्रिक उत्कृष्टतेचे प्रेरणादायी उदाहरण ठरला आहे. या यशामुळे महाविद्यालयाचा राष्ट्रीय पातळीवरील लौकिक अधिक वृद्धिंगत झाला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form