भावपुर्ण श्रध्दांजली********************* सोलापूरच्या पत्रकारितेतील ज्येष्ठ पत्रकार व लोकसत्ताचे सोलापूर जिल्हा प्रतिनिधी एजाज हुसेन मुजावर यांचे आज (गुरुवार) सकाळी ९.१५ वाजता झाले निधन...



एजाजहुसेन मुजावर मृत्यूसमयी ६० वर्षांचे होते...
मंगळवेढा /प्रतिनिधी
पत्रकार मुजावर यांचा ३८ वर्षांचा पत्रकारितेचा प्रदीर्घ प्रवास अखेर थांबला आहेत. एजाज मुजावर यांनी आपल्या पत्रकारितेची सुरुवात दै.संचार या दैनिकातून केली. स्व. रंगाअण्णा वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पत्रकारितेचे प्राथमिक धडे घेतले आणि पुढे लोकसत्ताचे सोलापूर जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करताना त्यांनी असंख्य मोठ्या बातम्यांच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सोडवले.

त्यांच्या ३८ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील राजकीय हालचाली, सामाजिक घडामोडी, शासकीय निर्णयप्रक्रिया, तात्कालिक घटना या सर्वांचा अभ्यासपूर्ण मागोवा घेतला. सोलापूर शहर आणि जिल्ह्याचा ते “चलता-बोलता संदर्भ ग्रंथ” म्हणून लौकिक मिळवले होते.

एजाज मुजावर यांची ओळख निस्पृह, निरपेक्ष आणि निर्भीड पत्रकार म्हणून होती. जिल्ह्यातील अनेक राजकीय नेते त्यांचा सल्ला घेत असत, तर नवोदित पत्रकार माहिती आणि संदर्भांसाठी त्यांच्याकडे धाव घेत. अचानक झालेल्या प्रकृती बिघाडाचा परिणाम तीन महिन्यांपूर्वी त्यांना विस्मृतीचा आजार जाणवू लागला. वैद्यकीय तपासणीत मेंदूवर गाठ असल्याचे निदान झाले. त्यानंतर त्यांच्यावर मुंबईच्या रिलायन्स हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली.

या उपचारांमुळे काही काळ आराम मिळाला; परंतु मागील आठवड्यात त्यांचा त्रास पुन्हा वाढला. आज सकाळीच त्यांना मुंबईहून सोलापुरात आणून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच सकाळी ९.१५ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली ते मुळचे मंगळवेढ्याचे रहिवासी हाेते.

पत्रकारिता क्षेत्रात शोककळा

एजाज मुजावर यांच्या निधनाने सोलापूर पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. विषयाची परिपूर्ण तयारी, अभ्यासू लिखाण आणि परखड भूमिका यामुळे त्यांनी पत्रकारितेतील एक वेगळी छाप निर्माण केली होती. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. ‘हॅलो सोलापूर’तर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form