स्वेरीत ‘जागरूक नागरिक– डिजिटल सुरक्षा, रस्ता सुरक्षा व महिला सुरक्षा’ हा जनजागृती उपक्रम

पंढरपूर प्रतिनिधी-- 
आजच्या तरुणाईला मार्गदर्शन करून त्यांना विधायक कार्यासाठी प्रेरित करण्यासाठी स्वेरीतील राष्ट्रीय सेवायोजनेतील स्वयंसेवकांनी पुढाकार घेवून विविध उपक्रमांच्या माध्यमातून अलीकडेच एक जनजागृती कार्यक्रम घेतला. स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी सुंदर अशा लघुनाटीकेच्या माध्यमातून समाजातील गुन्हेगारी थोड्या का प्रमाणात होईना कमी करण्यासाठी जनजागृती केली. ही लघुनाटिका पाहून गुन्हेगारीला आळा बसण्यास नक्कीच मदत होईल. विद्यार्थ्यांची ही जनजागृतीपर लघुनाटिका पाहण्यासाठी पंढरपूर येथील पोलिस बंधूही स्वेरीत आले होते. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध भूमिकांमधून समाजात चांगला संदेश पोहोचवला आहे. विद्यार्थ्यांनी केलेल्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 
        पोलीस विभाग, पंढरपूर आणि स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागरूक नागरिक– डिजिटल सुरक्षा, रस्ता सुरक्षा व महिला सुरक्षा’ हा जनजागृती कार्यक्रम गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) मध्ये घेण्यात आला. स्वेरीतील सर्वगुणसंपन्न असलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या लघुनाटिके मधील केलेल्या संवादातील चढ-उतार, चेहऱ्यावरील हावभाव, वस्तुस्थितीचे दर्शन यामुळे ही लघुनाटिका अधिक प्रभावी ठरते.  विद्यार्थ्यांच्या या कलात्मक सादरीकरणातून सामाजिक जबाबदारीची जाणीव प्रभावीपणे व्यक्त झाली. या नाट्यातून समाजातील मोबाईल वापराचे दुष्परिणाम, वाढती गुन्हेगारी यावर सुंदर लघुनाटक सादर करून समाजामध्ये गुन्हेगारी, मोबाईल वापराचा अतिरेक, अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नये यासाठी स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी उत्तमरित्या जनजागृतीचा संदेश दिला. लघु नाटिकेत विविध विषय निवडले होते. त्यात मुलींच्या छेडछाडी बाबत ‘उद्याची निर्भया आजच जागृत होऊ द्या’, खोटा व्यवहार करणाऱ्या ठगासाठी ‘आजची मदत उद्याचे आश्वासन’, बालविवाह रोखण्यासाठी ‘बालविवाह थांबवा भविष्य घडवा’, विश्वासार्हता पूर्वक व्यवहारासाठी ‘विश्वास जपा, फसवणूक टाळा’, सोशल मिडीयावर बनावट अॅप, लिंकच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या फसवणुकीबाबत ‘डिजीटल फसवणुकीचे जाळे आयुष्य उध्वस्त करते सगळे.’ ही पाच लघुनाटके विद्यार्थ्यांनी सादर केली

 तर या लघुनाटिकेत पियुष चोपडे-पाटील, आर्यन हंगरगेकर, सुशांत शेटे, धैर्यशील पवार, प्रताप काकडे, अमरजित रणखांब, विवेक मांजरे, रोहन तिडके, राहुल मदने, सौंदर्या जाधवर, प्रितम बढे, वैष्णवी मेटकरी, भावना चौधरी, सारा धुमाळ, गौरी महाजन व सिद्धी चव्हाण या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. प्रत्येकांनी उत्तम अभिनयाची चुणूक दाखवली. हा उपक्रम पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. टी. वाय. मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला तसेच या उपक्रमास पोलीस निरीक्षक मा.वडणे हे देखील उपस्थित होते. या लघुनाट्याची पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी अभिमन्यू गरड, महेश निकम, मोनिका वाघे, सुवर्ण कदम, ज्ञानेश्वर गायकवाड, विकास हजारे यांनी सूक्ष्मपणे पाहणी करून विद्यार्थ्यांची ही लघुनाटीका भविष्यात गुन्हेगारी कमी करण्यास मदत करेल.’ अशी आशा व्यक्त केली. संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली, कॅम्पस इन्चार्ज एम. एम.पवार यांच्या सहकार्याने उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. महेश मठपती, डॉ. यशपाल खेडकर, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. अमोल चौंडे व इतर प्राध्यापकांचे या लघुनाटिकेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form