सिंहगड महाविद्यालयाचा मोठा गौरव : तीन संशोधकांना विद्यावाचस्पती (Ph.D.) पदवीने सन्मानित

पंढरपूर प्रतिनिधी --
एस.के.एन.सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, पंढरपूर या रिसर्च सेंटरमधून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरींगच्या आशिष जोशी, अनिल कस्तुरे आणि राहूल कोनापुरे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या मार्फत विदयावाचस्पती (Ph.D.) पदवी बहाल करण्यात आली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
आशिष जोशी यांनी “मांडयाच्या हाडाच्या वरच्या भागातील फ्रॅक्चरचे जैववैद्यकीय प्रतिमांद्वारे विश्लेषण व मॉडेलिंग करून शस्त्रक्रियेचे नियोजन करणे” यावर संशोधन करुन संशोधनाची पायाभूत तत्त्वे आणि तात्त्विक आधार या विषयावर संशोधन केले. अनिल कस्तुरे  यांनी “IoT वापरांसाठी फ्रिक्वेन्सी मल्टिप्लायिंग रिफ्लेक्टेनाचे प्रोटोटाईप डिझाइन विकसित करणे” या विषयावर आधारित संशोधनाची पायाभूत तत्त्वे आणि तात्त्विक आधार या विषयावर संशोधन केले.   तसेच राहूल कोनापुरे यांनी “ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून औषधांचा पुरवठा-मार्ग सुरुवातीपासून शेवटपर्यंत तपासणे आणि त्यांची खरी-खुरी पडताळणी करणे, ज्यामुळे बनावट औषधे बाजारात येऊ नयेत” या विषयावर आधारित संशोधनाची पायाभूत तत्त्वे आणि तात्त्विक आधार या विषयावर संशोधन केले.     
संशोधनाच्या कालावधीत आशिष जोशी, अनिल कस्तुरे आणि राहूल कोनापुरे या तिन्ही संशोधकांनी महत्त्वपूर्ण संशोधन पेपर प्रकाशित केले असून अभिनव कल्पनांवर आधारित पेटंट्सही दाखल केली आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे महाविद्यालयाच्या संशोधन क्षेत्रातील गुणवत्ता व प्रतिष्ठेत लक्षणीय वाढ झाली आहे. 
आशिष जोशी व अनिल कस्तुरे यांना एस.के.एन.सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनियरींग, कोर्टी, पंढरपूर या रिसर्च सेंटर मधून मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.कैलाश करांडे यांचे मार्गदर्शन लाभले.  तसेच राहूल कोनापूरे यांना एस.के.एन.सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनियरींग, कोर्टी, पंढरपूर या रिसर्च सेंटर मधून मार्गदर्शक म्हणून एन.बी.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूरचे प्राचार्य डॉ. शंकर नवले यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form