पंढरपूर प्रतिनिधी--
पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्या प्रचार फेरीत माजी आमदार प्रशांतराव परिचारक, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट यांच्या समवेत पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे पाणीदार आमदार समाधान आवताडे यांच्या सह उमेदवार मतदार बंधु भगिनी मोठ्या संख्येने प्रचार फेरीत उपस्थित होते.
आज पंढरपूर शहरात वडर गल्ली येथुन नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचार फेरीचा सुरूवात आमदार समाधान आवताडे व माजी आमदार प्रशांत मालक परिचारक यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचार फेरीचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले.जातीपातीच्या राजकारणाला फाटा देत पंढरपूरचा विकास या मुद्यावर विश्वास ठेवत मतदारांनी मोठा प्रतिसाद दिला जात असल्याचे पाहायला मिळत आहे.
यावेळी नगराध्यक्ष उमेदवार श्यामल शिरसट तसेच
प्रभाग १ चे उमेदवार लखन चौघुले व अर्चना शिंदे, प्रभाग २ चे उमेदवार मयूर भिंगे व श्वेता डोंबे, प्रभाग ३ चे उमेदवार तेजश्री पानकर व कृष्णा कवडे यांच्यासह प्रभागातील प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.