पंढरपूर प्रतिनिधी --
कार्तिक यात्रेच्या सोहळ्यानंतर येणाऱ्या त्रिपुरी पौर्णिमा यादिवशीला अनन्य साधारण महत्त्व असून या दिवशी तुळशीचा विवाह श्रीकृष्ण भगवान यांच्याबरोबर मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला.तसेच चंद्रभागा नदीच्या किनारी सामुहिक दिपोत्सव साजरा करण्यात आला.
खऱ्या अर्थाने मानवी जीवनातील लग्न सोहळ्याला याच दिवशी पासून सुरुवात होत.आज त्रिपुरी पौर्णिमा कार्तिक पौर्णिमा निमित्ताने चौफळा येथील पुरातन अशा गोपाल कृष्ण मंदिरातील भगवान श्रीकृष्ण देव रुपी वरदेव व तुलसी वधुदेवी अर्थात तुळस यांचा विवाह मोठ्या भक्तीमय वातावरणात शेकडो वारकरी भाविकांच्या समवेत संपन्न झाला.याप्रंसगी गोपाळ कृष्ण मंदिराचे सागर बडवे,पियुष बडवे व पप्पू बडवे बडवे परिवार यांनी श्रीकृष्णाला सालंकृत अलंकार दागिन्याने सजविण्यात आले होते तर तुमचे देवीलाही सुंदर असे अलंकार घालण्यात आले होते. हा सोहळास वारकरी भाविक ही मोठ्या प्रमाणात जमले होते सर्वांच्या साक्षीने गोरज मुहूर्तावर श्रीकृष्ण देव व तुळशी देवी यांचा विवाह संपन्न.तसेच आज दुपारी बारा वाजता वारकरी भाविक भक्तांच्या उपस्थितीत गोपाल काला मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
Tags
सामाजिक वार्ता