अतुल चव्हाण यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तालुकाध्यक्ष पदी निवड--; प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांच्या हस्ते सत्कार

पंढरपूर प्रतिनिधी --
आज नागेश दादा फाटे यांच्या संपर्क कार्यालयात 
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पंढरपूर तालुकाध्यक्षपदी नुकत्याच निवड झालेल्या श्री. अतुल चव्हाण यांचा पक्षाचे व्यापार व उद्योग सेलचे प्रदेशाध्यक्ष श्री. नागेश फाटे यांच्या शुभहस्ते नुकताच शानदार सत्कार करण्यात आला.
यावेळी श्री. नागेश फाटे यांनी श्री.अतुल चव्हाण यांच्या कार्याची प्रशंसा केली आणि त्यांना पक्षात अधिक सक्रियपणे काम करण्याची प्रेरणा दिली. अतुल चव्हाण यांच्या अनुभवाचा आणि कामाचा पक्षाला नक्कीच मोठा फायदा होईल. त्यांनी तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळावी आणि पक्षाची ध्येये तळागाळापर्यंत पोहोचवावीत, यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो,"असे नागेश फाटे म्हणाले.

"प्रदेशाध्यक्ष श्री. नागेश फाटे यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचे आभार मानतो. पक्षाच्या नेतृत्वाच्या आदेशानुसार,मी पंढरपूर तालुक्यामध्ये पक्षाचे काम अधिक मजबूत करण्यासाठी आणि शरद पवार साहेबांचे विचार जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध राहीन,"असे अतुल चव्हाण यांनी यावेळी नमूद केले.या सत्कार समारंभासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी तालुका अध्यक्ष अनिताताई पवार, उद्योग व व्यापार विभागाच्या तालुका अध्यक्ष सावली बंगाळे गायकवाड, उद्योजक नवनाथ बचूटे सर, दुरुगकर केटरर्स चे मालक गणेश दुरुगकर, डॉ रमेश फाटे, निवृत्ती पाटील, संग्राम कापसे व इतर मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form