पंढरीत महाद्वार काला उत्साहात....,साजराअकरा वर्षीय बालकाच्या हातात पादुका देत उत्सव साजरा


पंढरपूर प्रतिनिधी 
मागील अकरा पिढ्यापासून सुरू असलेली महाद्वार काल्याची परंपरा यंदा हरिदास कुटुंबात घडलेल्या अघटीत घटनेमुळे खंडित  होणार का असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र हरिदास कुटुंबातील अकरा वर्षीय बालकाच्या हातामध्ये श्री विठ्ठलाच्या पादुका देत काल्याची परंपरा साजरी करण्यात आली.
आषाढी व कार्तिकी वारीमध्ये हरिदास व नामदास घराण्याच्या वतीने महाद्वार काला करण्याची परंपरा आहे. संत पांडुरंग महाराज हरिदास यांना प्रत्यक्ष श्री विठ्ठलाने दिलेल्या पादुका मस्तकावर धारण करून महाद्वार काला करण्याची परंपरा आहे. 

 दरम्यान यंदा हरिदास घराण्यातील एका तरुणाचे अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्यामुळे महाद्वार काला साजरा होणार का असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र जवळपास 400 वर्षाची परंपरा खंडित न करण्याचा निर्णय हरिदास, पुजारी व संत नामदेव महाराजांचे वंशज नामदास महाराज यांनी घेतला. त्यानुसार मदन महाराज हरिदास यांचे अकरा वर्षाचे नातू अमोघ याच्या गळ्यात पागोटे व हातात पादुका देण्यात आल्या. नामदास महाराज यांनी अमोघ हरिदास यास खांद्यावर घेऊन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पाच प्रदक्षिणा, दहीहंडी फोडणे. यानंतर चंद्रभागेच्या वाळवंटात पादुकास नदी स्नान, माहेश्वरी धर्मशाळा, आराध्ये गल्ली, हरिदास वेस येथे दहीहंडी फोडून काल्याची परंपरा पूर्ण करण्यात आली. यावेळी जागोजागी गुलाल, बुक्का व लाह्याची उधळण करण्यात आली. हजारो भाविकांनी काल्याचे दर्शन घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form