यंदाचा मानाचा *वारकरी पुरस्कार* तत्वचिंतक श्रीगुरु प्रमोद महाराज जगताप यांना जाहीर


पंढरपूर प्रतिनिधी-
वारकरी पंथाचे थोर सत्पुरुष चैतन्यसद्गुरू तात्यासाहेब बाबासाहेब वासकर महाराज यांच्या स्मरणार्थ प्रतिवर्षी वारकरी पंथाची सेवा करणाऱ्या सेवानिष्ठ विभूतीला " वारकरी पुरस्कार " प्रदान केला जातो.यावर्षीचा हा वारकरी पंथातील सर्वोच्च मानाचा पुरस्कार संत साहित्याचे साक्षेपी तत्वचिंतक श्रीगुरु प्रमोदमहाराज जगताप यांना जाहीर झाला असून त्याचे वितरण श्रीक्षेत्र पंढरीत सोमवार दिनांक 3 नोव्हेंबर रोजी होणार आहे.सन्मानचिन्ह ,सन्मानपत्र, महावस्त्र, श्रद्धानिधी असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

श्रीगुरु विठ्ठल महाराज वासकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि श्रीगुरु चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या शुभहस्ते सोमवार दिनांक 3 नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता वासकर  वाडा संतपेठ पंढरपूर येथे पुरस्कार वितरण होणार आहे . या समारंभास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्रीज्ञानराज प्रतिष्ठान मुंबई यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form