सदर मागणीबाबत उपमुख्यमंत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच हा निधी मंजूर होईल.
पंढरपूर प्रतिनिधी--सोलापूर जिल्ह्यातील एक सुंदर वास्तु असलेल्या पंढरपूर नामसंकीर्तन सभागृहाचे काम अंतिम टप्प्यात आले असून यासाठी 20 कोटी रुपये निधीची मागणी माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना भेटून केली आहे.
राज्यातील सर्वात मोठे तीर्थक्षेत्र असणाऱ्या पंढरपूर येथे विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम वर्षभर संपन्न होत असतात. यासाठी येथे भव्य नामसंकीर्तन सभागृह उभा करावे अशी मागणी मा.आ.प्रशांत परिचारक यांनी मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केली होती. याची दखल घेऊन सदर कामास मंजुरी देण्यात आली.
पंढरपूर शहरात नामसंर्कीतन सभागृहास महाराष्ट्र शासनाकडून मंजूरी मिळाली होती. सदर कामाची एकुण अंदाज पत्रकीय किंमत रू.39.47 कोटी होती. आता पर्यंत 25 कोटी इतका निधी पंढरपूर नगरपरिषदेस प्राप्त झालेला आहे. प्राप्त झालेल्या निधीतून झालेल्या कामाची बिले देणेत आलेली आहेत. सध्याच्या कामाच्या अंदाज पत्रकामध्ये वाढ झाली आहे. प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्यातील वॉल कंपाऊंड, प्लंम्बिंग, अग्नीशमन व विद्युत इ. काम 70 टक्के काम पुर्ण झालेले आहे.
तिसऱ्या टप्यातील नामसंकीर्तन सभागृहाचे अंतर्गत रस्ते, भुखंड विकास अंतर्गत रस्ते सुधारणा, फर्निचर व्यवस्था, विद्युत व्यवस्था, सिसिटीव्ही कॅमेरे, सौरऊर्जा कामे व रोहित्र स्थलांतरण इ. कामे करणचे असून यासाठी 20 कोटी रुपये निधी मिळावा अशी मागणी प्रशांतराव परिचारक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची भेट घेऊन केली असून याबाबतचे निवेदन त्यांना दिले आहे.