वारकरी भाविकांना आवश्यक सुविधा देण्याससोबतच स्वच्छतेला प्राधान्य - जिल्हाधिकाऱ्यांकडून शौचालयाची पाहणी

पंढरपूर, दि. 01: - 
कार्तिकी शुद्ध एकादशी सोहळा 02 नोव्हें 2025 रोजी संपन्‍न होत असून, कार्तिकी यात्रा कालावधीत लाखो वारकरी  भाविक येतात. या कालावधीत वारकरी भाविकांना दर्शनरांग, पत्राशेड, वाळवंट, भक्तीसागर (65 एकर) येथे पाणीपुरवठा,आरोग्य, सुरक्षा, स्वच्छतेच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
       पंढरपूर शहरात येणाऱ्या वारकरी- भाविकांना  प्रशासनाच्या वतीने चांगल्या दर्जेदार सोयी सुविधा उपलब्ध होण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सातत्याने प्रयत्नशील आहेत.प्रशासनाकडून  चांगल्या सुविधा उपलब्ध करून देत आहे.  
     यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्वतः प्रत्येक ठिकाणी जाऊन शौचालयाची व्यवस्था, त्या ठिकाणी पुरेसे पाणी उपलब्ध आहे का? स्वच्छता ठेवण्यात आली आहे का व वारकऱ्यांना शौचालयाचा वापर केल्यानंतर हात धुण्यासाठी हँडवॉश ची ही सोय या ठिकाणी करण्यात आले आहे त्याची पाहणी केली.  काही शौचालये स्वतः जिल्हाधिकारी यांनी उघडून पाहणी केली आहे. शौचालय साफसफाई करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ तसेच शौचालयाची वेळोवेळी स्वच्छता करण्यासाठी जेटींग व सक्शेन मशीन उपलब्धता करण्यात आली आहे. स्वच्छतेच्या  वाहनांना वाहतुकीचा कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे.  
00000000

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form