नातेपुते/प्रतिनिधी :
राज्याचे उपमुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात विकासाची नवी दिशा सुरू असताना, माळशिरस तालुक्यातील मौजे पिंपरी येथील आयोजित कार्यक्रमात शेकडो तरुणांनी शिवसेनेच्या भगव्या झेंड्याखाली प्रवेश करून संपूर्ण तालुका थरारून गेला.
"मातृभूमीची सेवा हीच सर्वोच्च सेवा" या ऊक्तीचा अंगीकार करत, राष्ट्रहित, जनहित आणि शिवसेनेच्या विचारधारेसाठी लढण्याचा संकल्प या तरुणांनी शिवसेनेच्या झेंड्याखाली घेतला. या कार्यक्रमाला शिवसेना नेते माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे,सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख महेश साठे,युवासेना जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठे,माळशिरस तालुकाप्रमुख सतीश सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश करण्यात आला.
दरम्यान तालुक्यातील कार्यप्रमुख महादेव तुपसौंदर, तालुका उपप्रमुख तानाजी भोळे, सुनील साठे,नातेपुते शहर प्रमुख पै.निखिल पंलगे, अकलूज शहर प्रमुख महेश पवार, सोशल मिडिया विधानसभा प्रमुख सुनील ढोबळे, सोशल मीडिया तालुकाप्रमुख अमोल साठे,मारुती मेटकरी यांचे सह सर्व शिवसैनिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी सिद्धाराम म्हेत्रे यांनी तरुणांना उद्देशून सांगितले की,
> “आजचा युवक हा महाराष्ट्राच्या भविष्यातील शिल्पकार आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यात विकास, प्रामाणिकपणा आणि जनतेसाठी झटणारी नवी शिवसेना उभी राहिली आहे. या सेनेत प्रत्येक कार्यकर्त्याला सन्मान, स्थान आणि संधी मिळते.”
युवकांच्या डोळ्यात जोश आणि छातीत अभिमान दिसत होता. "जय महाराष्ट्र! एकनाथ शिंदे साहेबांचा विजय असो! शिवसेना जिंदाबाद!" अशा घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले.
या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना माळशिरस तालुकाप्रमुख सतीश सपकाळ यांच्या नेतृत्वाखालील करण्यात आला.शिवसेनेच्या कार्यप्रणालीने आणि जनतेशी जोडलेल्या संवादाने प्रेरित होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका उपाध्यक्ष तुषार वाघमोडे,पिरळे गावचे माजी सरपंच आशोक तोडकर,पै.दत्ता रुपनवर, अखिल सूळ,गुरु कर्चे, यांच्या सह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर आज पक्षप्रवेश केला.
या कार्यक्रमाप्रसंगी युवकांनी सांगितले की,
> “शिवसेना ही केवळ राजकीय पक्ष नाही, ती एक विचारधारा आहे. आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना मंच देणारा, आमच्यासाठी झटणारा आणि जनतेसाठी लढणारा पक्ष म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना.”
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व नवीन शिवसैनिकांना भगवा शाल आणि शिवबंधन देऊन पक्षात औपचारिक स्वागत करण्यात आले. तालुक्यातील हा युवकांचा प्रवेश शिवसेनेच्या संघटनात्मक बळकटीचा नवा अध्याय ठरणार आहे.
माळशिरस तालुक्यातील तरुणांचा आजचा शिवसेनेत प्रवेश हा केवळ राजकीय घटना नसून, तो एक विचारप्रवाहाचा जागर परिवर्तनाच्या दिशेने पाऊल आहे. या उत्साहाने तालुका पुन्हा एकदा भगवामय झाला आहे.
Tags
सामाजिक वार्ता