व्हिजन आधार नागरी सहकारी पतसंस्थेचे मोठ्या दिमाखात उद्घाटन

पंढरपूर : प्रतिनिधी 
 पंढरपूर येथे नव्याने सुरू झालेल्या व्हिजन आधार नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, पंढरपूर या संस्थेचा उद्घाटन सोहळा शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडला. 
आपली पत! आपला अभिमान! हे ब्रीदवाक्य घेऊन पंढरपूर मधील नागरिकांच्या आर्थिक प्रगतीस आणि सामाजिक विकासास नवे बळ मिळावे या उद्देशाने पतसंस्थेचे संस्थापक,चेअरमन सोहन जैस्वाल यांनी स्थापन केलेल्या व्हिजन आधार नागरी सहकारी संस्थेचे उद्घाटन वंदना माधव सर्वगोड (आजी) यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात पार पडले.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी व्हिजन आधार नागरी सहकारी पतसंस्थेमुळे पंढरपूर शहराच्या विकासाला निश्चितच नवसंजीवनी मिळेल आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक गरजांना सक्षम आधार मिळेल असा विश्वास व्यक्त केला.
या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार प्रशांत परिचारक, आमदार अभिजीत पाटील, मनसे नेते दिलीप धोत्रे, राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे, काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष सुनंजय पवार, भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत, सोमनाथ आवताडे,सतिश सर्वगोड, सुरेंद्र सावंत, बाळासाहेब कसबे, संस्थेचे चेअरमन सोहन जैस्वाल, सचिव सुरज जैस्वाल, व्हा. चेअरमन जुनेद बागवान, संचालक डॉ. पराग कुलकर्णी, अमित कसबे, आकाश ढोबळे, संतोष सर्वगोड, मेधा भुईटे, रुक्मिणी पाटोळे, चंद्रकांत पवार, मयूर शिंदे, संतोष खिलारे तसेच पंढरपूरमधील व्यापारी, छोटे मोठे व्यावसायिक, विविध न्यूज चॅनलचे संपादक व पत्रकार बांधव उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form