*विश्व हिंदू परिषद दुर्गावाहिनीचा पंढरपुरात युवतींना लाठी,छुरीका,नियुध्द प्रशिक्षण*


 पंढरपूर ता.२७: 
दिवाळीच्या सुट्टीमध्ये यावर्षी विश्व हिंदू परिषद दुर्गा वाहिनीच्या वतीने पंढरपूरमध्ये तीन दिवसीय स्वसंरक्षण प्रशिक्षण पार पडले.  ४० युवती विद्यार्थिनी, प्रशिक्षित शिक्षिका आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. 
   स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्ग पंढरपुरातील न्यू सातारा संकुल नवीन सोलापूर रोड येथे संपन्न झाला. या वर्गामध्ये सहभागी युवतींना लाठी काठी, छुरीका नियुध्द ज्युडो कराटेचे प्रशिक्षण दिले. तसेच  बौद्धिक, योगासन प्राणायाम, देशी खेलकूद आणि  स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले. 
    यावेळी  विश्व हिंदू परिषद प्रांत सहमंत्री नितीन वाटकर, प्रांत सदस्य श्री विजयकुमार देशपांडे, समरसता प्रांत सदस्य रवींद्र साळे, प्रचार, प्रसार मंडळाचे केंद्रीय सदस्य मकरंद घळसासी,  साधना केंद्र प्रमुख समृद्धी ताई सराफ, विभाग संयोजिका प्रगतीताई नाकुरे, जिल्हा संयोजक पायल परदेशी, जिल्हा उपाध्यक्ष रेखाताई  टांक,मातृशक्ती विभाग संयोजिका भाग्यश्रीताई लिहिणे, तसेच विभाग सहमंत्री श्री विजयकुमार पिसे, जिल्हा सहमंत्री श्री गोपाळ सुरवसे , बजरंग दल जिल्हा संयोजक श्रीनाथ संगीतराव, जिल्हा कोषाध्यक्ष सुरेंद्र कवठेकर, बजरंग दलाचे कार्यकर्ते अक्षय मेनकुदळे, विठ्ठल अभंगराव, जय सुरवसे आदी उपस्थित होते.
   प्रशिक्षण वर्ग समारोप प्रसंगी रा.स्व.संघ संघचालक सुधाकर जोशी, सदुभाऊ कुलकर्णी, आयटी उद्योजक ऋतुजा देवधर, पत्रकार रामेश्वर कोरे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. विभाग सहमंत्री विजयकुमार पिसे यांनी समारोप प्रसंगी विहिंपच्या दुर्गा या नारीशक्ती आहेत, या दुर्गाच्या पुढे कोणत्याही दुष्ट शक्तीचा निभाव लागणार नाही. यामुळे दुर्गांनी हिंदू समाज जागरणाचे कार्य अधिक वेगाने करावे. नॅरेटिव्हच्या माध्यमातून युवाशक्ती बिघडवण्याचे काम सूत्रबद्धपणे सुरू आहे. त्यावरही या दुर्गा मात करतील, असा विश्‍वास  विहिंप विभाग सहमंत्री विजयकुमार पिसे व्यक्त केला.
संघचालक जोशी यांनी विहिंप स्थापनेची पृष्ठभूमी विषद केली. संघ संस्थापक डॉ हेडगेवार आणि सरसंघचालक श्री गुरुजी यांचे यासाठीचे योगदान सांगितले.
      .......

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form