पंढरपूर प्रतिनिधी --
पंढरपूर तालुक्यातील कोंढरकी ग्रामस्थ व नेहरू युवा मंडळाच्या वतीने ए.पी.आय.सुरज निंबाळकर यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना ते आपल्या संपूर्ण जीवनप्रवास सांगितला कौटुंबिक जबाबदारी संपूर्णपणे सांभाळत त्यांनी यश प्राप्त केले.अनेक संकटांवर मात करीत एम पी एससी अभ्यास करून 2015 मध्ये पी एस आय पदी निवड झाली सुरूवात गडचिरोली येथे व नंतर सोलापूर येथे गुन्हा शाखेत कर्तव्य बजावत असताना त्यांना पदोन्नती मिळाली असुन मुंबई पोलीस येथे ए पी आय म्हणून झाली आहे. या सर्व यशाचे श्रेय ते कुटुंबातील सर्व सदस्य व मित्रपरिवामुळे शक्य झालेले आहे असे सांगितले.तसेच त्यांनी युवा युवती यांना मोलाचे मार्गदर्शन करताना अकॅडमीतील विद्यार्थ्यांनी सातत्याने प्रयत्न करण्यास सांगितले जिद्द चिकाटीच्या जोरावर कोणती गोष्ट अशक्य नाही असा मोलाचा संदेश त्यांनी दिला.
आभार प्रदर्शन राजेंद्र फुगारे यांनी मानले.यावेळी नेहरू युवा मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते तसेच गावातील ग्रामपंचायत सदस्य अतुल पाटील, समाजसेवक राम पाटील, हनुमान पाटील, नवनाथ पाटील, अज्ञान दांडगे, आनंद दांडगे, सागर दांडगे,प्रताप दांडगे,राहुल नागणे, सागर नागणे, मुंबई पोलीस सचिन मांजरे, नितीन दांडगे,विनोद लाटे, दांडगी पाटील परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच कोंढारकी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
सामाजिक वार्ता