पंढरपूर (प्रतिनिधी) –
सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, कोर्टी, पंढरपूर येथील संगणक अभियांत्रिकी विभागात दिनांक १ ऑक्टोबर २०२५ रोजी तृतीय वर्ष बी.टेक विद्यार्थ्यांसाठी "सेलेनियमचा उपयोग ऑटोमेशन चाचणीसाठी" या विषयावर तज्ञ व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
या व्याख्यानाचे मुख्य वक्ते म्हणून श्री. युसुफ तांबोळी, सोल्यूशन आर्किटेक्ट आणि गुणवत्ता आश्वासन प्रमुख, सिटिअसटेक, पुणे हे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना ऑटोमेशन चाचणी या क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती दिली. विशेषतः सेलेनियम साधन, वेबड्रायव्हर, टेस्टएनजी, जेनकीन्स, मेव्हन यांसारख्या तंत्रज्ञानांचा उद्योग क्षेत्रात कसा वापर होतो याचे मार्गदर्शन केले. तसेच सतत एकत्रीकरण व सतत वितरण (Continuous Integration / Continuous Deployment - CI/CD) प्रक्रियेत ऑटोमेशन चाचणीची उपयुक्तता स्पष्ट केली.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रा. डॉ. सुभाष पिंगळे, संगणक अभियांत्रिकी विभागप्रमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. कैलाश करांडे आणि उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांचाही सत्कार करण्यात आला. व्याख्यानाप्रसंगी प्रा. डॉ. सुभाष पिंगळे यांनी श्री. युसुफ तांबोळी यांचा सत्कार पुष्पगुच्छ देऊन केला.
कार्यक्रमाचे समन्वयन श्री. बाळकृष्ण जगदाळे यांनी यशस्वीपणे पार पाडले, तर सूत्रसंचालन कु. मयुरी कुलकर्णी यांनी केले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शविला आणि प्रश्नोत्तरे सत्रात उत्साहाने सहभाग घेतला.
या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना ऑटोमेशन चाचणी साधने आणि तंत्रज्ञानाचा व्यावहारिक अनुभव मिळाला तसेच उद्योग क्षेत्रातील नविनतम तंत्रज्ञानांची ओळख झाली. हा कार्यक्रम यशस्वी होणेसाठी विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
Tags
शैक्षणिक वार्ता