पंढरपूर प्रतिनिधी --
श्रद्धेय स्व. सुधाकरपंत परिचारक यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थीनी सहभाग नोंदविला होता.सदर वक्तृत्व स्पर्धा उमा शिक्षण समूहाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आली होती.
अश्विन शुद्ध अष्टमी अर्थात दुर्गाष्टमीला श्रद्धेय स्व. सुधाकरपंत परिचारक यांच्या 90 व्या जयंतीनिमित्त उमा शिक्षण संकुलामध्ये दरवर्षीप्रमाणे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या होत्या. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून अनेक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला या स्पर्धेचे परीक्षक म्हणून सर्वश्री मंदार केसकर, प्रताप चव्हाण, दीपक इरकल, डॉ.प्रशांत ठाकरे यांची नेमणूक करण्यात आली होती. त्याचबरोबर परीक्षकांच्या हस्ते "अभिनव" या स्व. मोठ्या मालकांच्या जीवनावर आधारित भित्तीपत्रकाचे प्रकाशनही करण्यात आले. तसेच बहुसंख्य विदयार्थ्यांनी सखोल अभ्यासपूर्ण आपल्या विषयांची मांडणी आपल्या वक्तृत्वातून केली.
त्यावेळी संस्थेचे ज्येष्ठ सदस्य मार्गदर्शक मुकुंद परिचारक, डॉ.मिलिंद परिचारक, राजगोपाल भट्टड, रमेश लाड हे उपस्थित होते. तसेच पारितोषिक वितरणाला युवक नेते ॲड. प्रणव परिचारक व प्राचार्य धीरजकुमार बाड यांच्यासहित सर्व प्राध्यापक वृंद, विद्यार्थी हे उपस्थित होते.
Tags
सामाजिक वार्ता